Posts

Showing posts from November, 2012

उच्चशिक्षण एक फसवी संकल्पना

Image
उच्चशिक्षणाचा आयचा घो! (मूळ शीर्षक) [हा लेख दोन वर्षापूर्वी लिहिला असल्यामुळे त्या काळातले संदर्भ आलेले आहेत. मला यात काहीही बदल करावासा वाटला नाही. त्यामुळे काही मुद्दे खटकण्याची शक्यता आहे. वाचकांनी आजच्या संदर्भात यातील विचार ताडून बघावेत.] आपण जर आजूबाजूला पहिले तर आपल्या लक्षात येईल की सध्या दोन प्रकारचे लोक आपल्या आसपास वावरत आहेत.  पहिले : साक्षर ,  दुसरे : निरक्षर.   दुसऱ्या गटातल्या लोकांचं प्रमाण साधारण वीस ते चाळीस वर्षांपूर्वी खूप होतं. पण त्यांचं झपाट्यानं पहिल्या गटात रुपांतर होत चाललय. आज साक्षरतेच प्रमाण प्रचंड वाढलय पण साक्षर झाले म्हणजे सर्वच क्षेत्रात आपण अग्रेसर राहू असा गैरसमज पसरलाय. पहिल्या गटात आता अनेक उपगट तयार झाले आहेत. उदा. दहावी-बारावी पास, पदवीधर, पदविकाधारक, किमान कौशल्यावर आधारित सर्टीफिकेट घेतलेले पण या सर्वात एक चमत्कारिक बदल दिसतो. तो म्हणजे पदवीधर आणि विना पदवीधर. म्हणजे भारतात असणाऱ्या जातीसारखी आता नवीन 'जात' तयार होतेय. पदवीधर या वर्गाला नोकरीच्या प्रचंड संधी व डोळे पांढरे करणाऱ्या वेतनामुळे प्रतिष...