Behind Every Great Fortune There Is A Crime
२०११ मध्ये लातूर पॅटर्न कादंबरी प्रकाशित झाली होती. कादंबरी लिहिली ती माझ्या कॉलेजातील अनुभवांवर आधारित. मी १९९८-२००३ अशी पाच वर्ष अनुक्रमे बीकॉम व बीएस्सीमध्ये नापास होतो. पुढे बीए-एमए केलं. त्यामुळे कादंबरी त्या नापास व नंतर बीए-एमएच्या दिवसांवर आधारित आहे. नापास विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून ती लिहिली आहे. २०१४ ला मी पुण्याहून लातूरला परत आलो. या गेल्या बारा वर्षात लातूर पॅटर्न चं रुपडं पूर्णपणे बदलल्याचं दिसून आलं. आमच्यावेळी खाजगी क्लासेस होते पण त्यांचा आता इतका प्रभाव नव्हता. शाळा, कॉलेजातील टक्केवारीलाच महत्त्व होतं. आरसीसीमुळे ट्युशन एरियात एक इको सिस्टीम* तयार झालेली दिसून आली. लातूरचा शैक्षणिक अवकाश वाढीला लागलेला दिसून आलेला. राजस्थानातील कोटा नंतर लातूरचं नाव घेण्यात येऊ लागलं. आताशा गेल्या पाच, सहा वर्षात अमली पदार्थांमुळे विद्यार्थी बिघडतायत असंही दिसून येत होतं. [*या विषयी मी अविनाश चव्हाण या क्लास संचालकाच्या हत्ये नंतर लेख लिहिलेला त्याची लिंक खालती पोस्टच्या शेवटी.] पैश्यांची मुबलकता जिथे असते तिथे वाममार्ग व गुन्हेगारी फोफावायला लागते. अविनाश चव्हाण ह...