Posts

Showing posts from June, 2017

पंचवीस वर्षे

Image
घर ८५ ला घराचं बांधकाम चालू झालं. तेव्हा औसा रोडच्या परिसरात मोजकीच घरे होती. जुना औसा रोड लहान असल्यामुळे नवीन औसा रोड तयार केला होता. त्याच्या लगतच प्लॉट असल्यामुळे तिथेच घर बांधायला घेतलं वडिलांनी. पहिल्यांदा बोर घेतला. ३५ फुटांवर पाणी लागलं. इतक्या वरच्या पातळीवर पाणी लागल्यामुळे अजून खूप खोल जायची गरज नाही म्हणून फक्त ११० फुटांपर्यंत बोर घेण्यात आला. घराचं बांधकाम झाल्यावर त्याच्यावर मोटर बसवण्यात आली. बांधकाम पूर्ण झालं. चार खोल्या, संडास-बाथरूम इतकंच बांधलं होतं. तेव्हा लोड बेअरिंगचे बांधकाम करणं सर्रास व स्वस्त असायचं. आमचं घर पण तशाच पद्धतीने बांधलेलं होतं. दोन खोल्यांची जागा सोडून उर्वरित जागेत बांधण्यात आलं. ८६ साली वास्तुशांती करून गृहप्रवेश केला. आजूबाजूला घरांची संख्या कमी असल्यामुळे बोरचे प्रमाण सुद्धा कमी होते. त्यामुळे पाण्याचा उपसा कमी व उपलब्धता भरपूर होती. सबमर्सिबल पंपसेट बसवलेली बोर तेव्हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडायचा. एल निनो व ला निनोचे परिणाम दिसायला अजून अवकाश होता. त्याचा फायदा उन्हाळ्यात बोरला पाणी राहण्यासाठी व्हायचा. आजूबाजूला घरांची संख्या हळ...