Posts

Showing posts from December, 2014

ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम : वाचनीय पण…

Image
कविता महाजन या गांभीर्याने लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. त्यांच्या ब्र आणि भिन्न या दोन कादंबऱ्या वाचकांच्या आणि समीक्षकांच्या पसंतीस पडल्या आहेत. खासकरून ब्र तर सर्वांची आवडती कादंबरी ठरली. बऱ्याचदा चर्चेत आणि स्त्री वाचकांच्या बोलण्यात आपण त्यातल्या प्रफुल्लाशी रिलेट झालो आहोत असा अभिप्राय येतो.  त्यानंतरची भिन्न एड्स आणि त्या अनुषंगाने समाजाचा उभा छेद दाखवणारी कादंबरी बरीच चर्चिली गेली. नुकतीच प्रकाशित झालेली ठकी आणि मर्यादित पुरुषोत्तम ही कादंबरी सिनेमा-नाटकात काम करणाऱ्या स्त्रीचं आत्मचरित्र असणारी कादंबरी आहे. पद्मजा सप्रे असं नायिकेचं नाव. ती लहानपणापासून सिनेमा-नाटकात कामं करत आली आहे. परिस्थितीमुळे तिला पहिल्यांदा सिनेमात काम मिळते. त्यामुळे तिचं घर उभं राहणार असतं. समोर येईल त्या परिस्थितीला तोंड देत पद्मजा आयुष्य जगते. पुढे तिला कुठल्याही पुरुषापासून सुख मिळत नाही म्हणून ती एकट्याने एका मुलीला जन्माला घालते. तिचं पालनपोषण करून स्वतःसारखी स्वतंत्र विचाराची स्त्री बनवते. जन्म दिलेली आई त्रास देते म्हणून समाजाचा रोष पत्करून तिला एका फ्लॅटमध्य...