Posts

Showing posts from March, 2017

एक जुनी बातमी

1. ही एक जुनी बातमी . पाच वर्षांपूर्वीची. आज एका निमित्ताने याची आठवण झाली. लातूरच्या निखील गटागट नावाच्या मुलाने आपलं अपहरण झालंय व चोरट्यांनी जवळचे साठ हजार रूपये, मोबाईल, लॅपटॉप चोरून चोप देऊन वाशी पुलावरून पाण्यात टाकले असं पोलिसांना सांगितलं. तो पुण्यात सीओइपीला तिसऱ्या वर्षाला होता. पोलिसांनी पुण्यातली केस म्हणून पुणे पोलिसांकडे सुपूर्द केली. त्यांनी त्याला मार लागलंय म्हणून लातूरला पाठवलं. तोपर्यंत त्याचं अपहरण झालंय पण तो वाचलाय हे घरच्यांना कळलं. काही दिवसांनी पोलिसांनी परत एकदा चौकशीसाठी त्याला बोलावलं. त्यानं सांगितलेल्या घटनात संगती लागत नव्हती म्हणून त्यांनी त्याला विचारलं तो क्लासेस का अटेंड करत नाही व पाचव्या-सहाव्या सेमिस्टरचे रिझल्ट्स पण सांगितले.  तेव्हा त्याने आपण खोटच सांगितलंय असं कबूल केलं. तसेच हा सगळा बनाव त्यानेच रचलाय असंही कबूल केलं. इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात तो नापास झाला होता व त्याला अभ्यासक्रम झेपत नव्हता. त्या दरम्यान इंग्रजी क्राईम थ्रिलर्स वाचायची सवय लागली होती. ते वाचून आपणही लेखक व्हावे असं त्याला वाटायला लागलं. पण घरच्यांच्या अपेक्षा पूर...

कॉपीचा लातूर पॅटर्न

Image
आज लोकसत्तेच्या पहिल्याच पानावर ही बातमी वाचली. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही जाणवलं नाही. लोकसत्तेला का त्यात वेगळेपणा दिसून आला काय माहिती. कदाचित कधीकाळी लातूर पॅटर्नमुळे इथल्या विद्यार्थ्यांचं नाव महाराष्ट्रात आदरानं घेतला जात होतं म्हणून असेल कदाचित. ही मुलं खरंच हुशार असतात का (हुशारी कशावरून जोखतात त्याचं त्यांनाच माहित.) याची चौकशी या पेपरने केलेली ऐकिवात नाही. तरीही कॉपीचा लातूर पॅटर्न असं हेडिंग देऊन किती शर्मानक बात है अशा पद्धतीचं वगैरे त्यात लिहिलेलं आहे. ‘गुणवत्तेचा’ (परीक्षेत भरमसाठ मार्क्स घेणे जर गुणवत्ता असेल तर धन्यच गोष्ट आहे.) लातूर पॅटर्न निर्माण करून राज्यातून इथे स्थलांतरित व्हायला लोकांना भाग पाडलं होतं म्हणे. पण एकूणच ही बातमी वाचून बऱ्याच वर्षांपूर्वीचे काही किस्से आठवले.  वर्ष : १९९६ परीक्षा : १० वीची स्थळ : देशिकेंद्र विद्यालय, लातूर या वर्षी मी दहावीत होतो. वरील शाळेत वार्षिक परीक्षेचा नंबर आलेला. लातूर पॅटर्नचा भरभराटीचा काळ. मी ज्या वर्गात बसलो होतो त्याच वर्गात सदानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, लातूरचे विद्यार्थी होते. ...