Posts

Showing posts from September, 2017

माय बिलव्ड बॉडीगार्ड (द बॉडीगार्ड): नॉट अप टू द मार्क

Image
सॅमो हंगने शेवटचा सिनेमा दिग्दर्शित केला होता १९९७ मध्ये. त्यावर्षी त्याने दिग्दर्शित केलेले दोन सिनेमे आले होते. पहिला होता सॉय हकने सुरुवात केलेल्या वन्स अपोन अ टाइम ईन चायना मालिकेतला शेवटचा भाग वन्स अपोन अ टाइम ईन अमेरिका अँड चायना . त्यात जेट लीने वॉंग फे हंगचं पात्र परत एकदा निभावलं होतं. तर दुसरा होता जॅकी चॅनचा मि. नाईस गाय . त्यानंतर हंगने दिग्दर्शनातून अंग काढून घेतलेलं पण इतरांच्या सिनेमात कधी खलनायकाचे तर कधी सहकाऱ्याचे काम केले. शा पो लँगमधला खलनायक त्याने चांगला वठवला होता. त्यातील त्याची व डॉनी येनची किंवा विल्सन यिपच्याच ईप मॅन दोनमधली मारामारी त्यांच्या ८०-९० च्या सिनेमातल्या मारामारीची आठवण करून देणारी होती. इतर सिनेमात सहाय्यक भूमिकेत वावरल्यामुळे कदाचित दिग्दर्शनाला विषय मिळाला नसावा. एखाद्या चित्रप्रकारात वर्षानुवर्षे काम केलेल्या कलाकाराकडून त्याच प्रकारचा सिनेमा अपेक्षित असतो. इंगमार बर्गमनने हॉलीवूड ब्लॉकबस्टर जसं अपेक्षित नाही तसं हंगने मानवी नातेसंबंधावर आधारलेला सिनेमा अपेक्षित नाही. हंगचा हा सिनेमा काही प्रमाणात त्याच्या पूर्वीच्या अपेक्षा पूर...