माय बिलव्ड बॉडीगार्ड (द बॉडीगार्ड): नॉट अप टू द मार्क
सॅमो हंगने शेवटचा सिनेमा दिग्दर्शित केला होता १९९७ मध्ये.
त्यावर्षी त्याने दिग्दर्शित केलेले दोन सिनेमे आले होते. पहिला होता सॉय हकने
सुरुवात केलेल्या वन्स अपोन अ टाइम ईन चायना मालिकेतला शेवटचा भाग वन्स अपोन अ
टाइम ईन अमेरिका अँड चायना. त्यात जेट लीने वॉंग फे हंगचं पात्र परत एकदा निभावलं
होतं. तर दुसरा होता जॅकी चॅनचा मि. नाईस गाय. त्यानंतर हंगने दिग्दर्शनातून अंग काढून घेतलेलं पण इतरांच्या सिनेमात कधी खलनायकाचे तर कधी सहकाऱ्याचे काम
केले. शा पो लँगमधला खलनायक त्याने चांगला वठवला होता. त्यातील त्याची व डॉनी
येनची किंवा विल्सन यिपच्याच ईप मॅन दोनमधली मारामारी त्यांच्या ८०-९० च्या
सिनेमातल्या मारामारीची आठवण करून देणारी होती. इतर सिनेमात सहाय्यक भूमिकेत
वावरल्यामुळे कदाचित दिग्दर्शनाला विषय मिळाला नसावा.
एखाद्या चित्रप्रकारात वर्षानुवर्षे काम केलेल्या
कलाकाराकडून त्याच प्रकारचा सिनेमा अपेक्षित असतो. इंगमार बर्गमनने हॉलीवूड
ब्लॉकबस्टर जसं अपेक्षित नाही तसं हंगने मानवी नातेसंबंधावर आधारलेला सिनेमा
अपेक्षित नाही. हंगचा हा सिनेमा काही प्रमाणात त्याच्या पूर्वीच्या अपेक्षा पूर्ण
करतो पण पूर्णतः नाही.
हंगच्या कुठल्याही सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तम प्रकारे कोरिओग्राफ केलेले/बसवलेले ऍक्शन सेट पिसेस, त्याला जलद, शार्प संकलनाची जोड व त्यांना जोडणारे कथानक. कथानकात त्यावेळच्या प्रेक्षकांना खेचता यावं म्हणून विनोदाचा केलेला वापर कधी आवश्यक तर कधी अनावश्यक. हंगची मारामारी ही सत्तरच्या दशकातल्या मार्शल आर्ट्स सिनेमातल्या मारामारीपेक्षा वेगळी असायची. त्या जास्तीत जास्त वास्तववादी असायच्या. जरी त्याने सत्तरच्या दशकात काम करायला सुरुवात केली असली तरी. जॅकी चॅन, यूएन वो पिंग, युआन बियू व हंगने हॉंगकॉंग सिनेमाला खऱ्याच्या जवळ जाणारी मारामारीची शैली प्रदान केली. आज हॉंगकॉंग बाहेर टोनी जा व इको युवाईस तीच परंपरा पुढे चालवतायत.
हंगच्या कुठल्याही सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे उत्तम प्रकारे कोरिओग्राफ केलेले/बसवलेले ऍक्शन सेट पिसेस, त्याला जलद, शार्प संकलनाची जोड व त्यांना जोडणारे कथानक. कथानकात त्यावेळच्या प्रेक्षकांना खेचता यावं म्हणून विनोदाचा केलेला वापर कधी आवश्यक तर कधी अनावश्यक. हंगची मारामारी ही सत्तरच्या दशकातल्या मार्शल आर्ट्स सिनेमातल्या मारामारीपेक्षा वेगळी असायची. त्या जास्तीत जास्त वास्तववादी असायच्या. जरी त्याने सत्तरच्या दशकात काम करायला सुरुवात केली असली तरी. जॅकी चॅन, यूएन वो पिंग, युआन बियू व हंगने हॉंगकॉंग सिनेमाला खऱ्याच्या जवळ जाणारी मारामारीची शैली प्रदान केली. आज हॉंगकॉंग बाहेर टोनी जा व इको युवाईस तीच परंपरा पुढे चालवतायत.
कथेनुसार डिंग (हंग) चीन व रशियाच्या सीमारेषेजवळ असणाऱ्या
एका शहरात राहतोय. त्याला डिमेन्शिया झालाय. त्याला दररोजच्या गोष्टी लक्षात रहात
नाहीत. तरीही दोन घरं सोडून राहणारी चेरी त्याच्याकडे नेहमी येत असते. तिचा वडील
एक जुगारी आहे. हंगच्या वयाला शोभणारी ही भूमिका. त्याच्या अभिनयाच्या मर्यादा
लक्षात घेऊन त्याला कमीत कमी संवाद देण्यात आले आहेत. तसेच त्याच्या व मुलीच्या
नातेसंबंधावर सिनेमाचा भर आहे. ज्या गोष्टीसाठी तो प्रसिद्ध आहे ती गोष्ट मात्र
सिनेमात शेवटी येते. त्यासाठी कथानक फुलवण्यात आलंय.
हंगची मात्र यात गोची झालीय का असं त्याची मारामारी बघून
वाटतं. एकीकडे ते पात्राच्या वयाला शोभणारं आहे तर दुसरीकडे हंगनेच तीन
वर्षांपूर्वी आलेल्या राईज ऑफ द लीजंड मध्ये खलनायकाची भूमिका केली त्यात
मारामारीचे चांगले प्रसंग दिले होते. त्यामुळे यातील मारामारी बघून हंगनेच ती केली
आहे हे पटत नाही. यावेळी तंत्रज्ञानाचा वापर बराच केलेला दिसून येतो. कॅमेरा,
त्याच्या हालचाली, वायरवर्क, असंख्य छोट्या छोट्या प्रसंगात कट्स, मारलेल्या
लोकांची हाडे मोडलीयेत दाखवण्यासाठी सीजीआयचा वापर हे हंगच्या सिनेमात कधीच दिसून
आलं नाही. तसेच रक्ताचा वापर सुद्धा. कदाचित नव्या पिढीच्या प्रेक्षकांना
कळण्यासाठी याचा वापर केला असणार. यापूर्वी स्टंट्स व प्रत्यक्ष कराटे प्रशिक्षित
अभिनेत्यांच्या कौशल्यावर त्याने एकाहून एक सरस ऍक्शन सेट पिसेस दिले आहेत. जिथे
प्रशिक्षित अभिनेते नाहीत त्यांना तेवढ्यापुरतं शिकवून व्हिज्युअली उत्तम परिणाम
साधलाय.
हे नक्कीच अप टू द मार्क नाही. अशाने सिनेमा तात्पुरता बरा
वाटतो पण दीर्घकाळ स्मरणात रहात नाही. तसेच सिनेमात बऱ्याचदा एरिअल शॉट्सचा वापर
केला आहे हे सुद्धा हंगच्या सिनेमात प्रथमच. कथानकासाठी वापर केला असेल असं म्हटलं
तर हंग व ती मुलगी यांच्यातल्या नात्याला सुद्धा जास्त वाव नाही. शेवटच्या
मारामारीसाठी कथानक वाढवत नेण्यात आलेलं त्यामुळे तर त्याच्या सिनेमात मधे मधे
येणारे ऍक्शन प्रसंग इथे येत नाहीत. कथानक कंटाळवाणं झालंय. धड नातेसंबंधावर भर
दिलेला नाही की ऍक्शनवर. त्यामुळे असं एक ना धड अशी अवस्था आहे सिनेमाची.
जॅकी चॅन व सॅमो हंग आता वृध्द झालेत. जॅकीचा चायनीज
झोडियॅक आणि हा असेच विझत चाललेल्या सर्जनशीलतेचे दिवे आहेत म्हणून म्हणावे लागतील.
विझण्यापूर्वी दिवा मोठा होतो हे मात्र होत नाहीयेत इतकंच.





Comments