Posts

Showing posts with the label Jackie Chan

द किलर : अॅक्शन क्लासिक आणि जॉन वू

Image
यावर्षी मार्चमध्ये (२०२०) द किलर ला प्रदर्शित होऊन एकतीस वर्ष झाले. जॉन वू दिग्दर्शित या सिनेमाने हॉंगकॉंग सिनेमाचा खऱ्या अर्थाने चेहरामोहरा बदलला. या सिनेमाने हॉंगकॉंग सिनेमाला ब्रूस लीच्या व विनोदी सिनेमाच्या प्रभावाखालून काढलं आणि थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन पोचवलं. पण निव्वळ याच सिनेमाने नव्हे तर याआधी आलेल्या जॉन वूच्याच अ बेटर टुमारो (१९८६) व अ बेटर टुमारो २ (१९८७) या दोन सिनेमांनी हॉंगकॉंग सिने उद्योगाला एक नवा अभिनेता व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभाव टाकणारा पॉलिश्ड दिग्दर्शक दिला. जॉन वूचे सिनेमेच नव्हे तर ऐंशीच्या दशकातल्या हॉंगकॉंग सिनेमाने एकुणातच कात टाकायला सुरूवात केली होती. सॉय हक ( Tsui Hark ) , जॅकी चॅन , सॅमो हंग , युआन बियू व रिंगो लॅम यांनी पारंपारिक हॉंगकॉंग सिनेमात अमुलाग्र बदल करण्यावर भर दिला. या सर्व कलावंतातील सामाईक गोष्ट म्हणजे यांनी हॉंगकॉंग अॅक्शन सिनेमा या जॉनरला आधुनिक करून तो प्रस्थापित केला. यापूर्वी अॅक्शन जॉनर अस्तित्वात नव्हता असं नव्हे तर तो पोशाखी मार्शल आर्टसच्या स्वरूपात होता. त्यातल्या त्यात तलवारबाजी असणाऱ्या वुशा ( Wuxia ) जॉनर हॉंगकॉंगम...

माय बिलव्ड बॉडीगार्ड (द बॉडीगार्ड): नॉट अप टू द मार्क

Image
सॅमो हंगने शेवटचा सिनेमा दिग्दर्शित केला होता १९९७ मध्ये. त्यावर्षी त्याने दिग्दर्शित केलेले दोन सिनेमे आले होते. पहिला होता सॉय हकने सुरुवात केलेल्या वन्स अपोन अ टाइम ईन चायना मालिकेतला शेवटचा भाग वन्स अपोन अ टाइम ईन अमेरिका अँड चायना . त्यात जेट लीने वॉंग फे हंगचं पात्र परत एकदा निभावलं होतं. तर दुसरा होता जॅकी चॅनचा मि. नाईस गाय . त्यानंतर हंगने दिग्दर्शनातून अंग काढून घेतलेलं पण इतरांच्या सिनेमात कधी खलनायकाचे तर कधी सहकाऱ्याचे काम केले. शा पो लँगमधला खलनायक त्याने चांगला वठवला होता. त्यातील त्याची व डॉनी येनची किंवा विल्सन यिपच्याच ईप मॅन दोनमधली मारामारी त्यांच्या ८०-९० च्या सिनेमातल्या मारामारीची आठवण करून देणारी होती. इतर सिनेमात सहाय्यक भूमिकेत वावरल्यामुळे कदाचित दिग्दर्शनाला विषय मिळाला नसावा. एखाद्या चित्रप्रकारात वर्षानुवर्षे काम केलेल्या कलाकाराकडून त्याच प्रकारचा सिनेमा अपेक्षित असतो. इंगमार बर्गमनने हॉलीवूड ब्लॉकबस्टर जसं अपेक्षित नाही तसं हंगने मानवी नातेसंबंधावर आधारलेला सिनेमा अपेक्षित नाही. हंगचा हा सिनेमा काही प्रमाणात त्याच्या पूर्वीच्या अपेक्षा पूर...

जॅकी चॅन आणि मी

Image
जॅकी चॅन माझ्या आयुष्यात कधी आला ते नेमकं आठवत नाही पण माझ्या वडिलांना व एका आतेभावाला तो प्रचंड आवडायचा . लातुरात तेव्हा उषाकिरण , रत्नदीपसारखे थिएटर्स फक्त याचेच सिनेमे दाखवायचे किंवा हाँगकाँगचे कुंग - फू कराटेचे सिनेमे दाखवायचे . जॅकी चॅन सोबत सॅमो हंग , युआन बियू , मिशेल यो या व ईतर अॅक्शन जॉनराला वाहिलेल्या नटनटींचे सिनेमे यायचे पण सटीसामाटी . जॅकी चॅन मात्र त्या दोघांना खूप आवडायचा . ते दोघं चित्रपट आला की आवर्जून बघायला जायचे . मला आठवतय मी  त्याचा  पहिला चित्रपट बघितला तो प्रोजेक्ट ए भाग दोन . हा चित्रपट प्रोजेक्ट ए चा सिक्वल होता परंतु फक्त कथानायक जॅकी चॅन सोडला तर ईतर महत्त्वाचे कलाकार युआन बियू व सॅमो हंग नव्हते . तरीपण तो लक्षात राहिला त्यातल्या अॅक्शन प्रसंगांसाठी .  त्यात शेवटाकडे एक प्रसंग आहे . जॅकीला पकडून एका मोठ्या कांडप यंत्रात ठेवले जाते अन्   कांडप यंत्र चालू केलं जातं . कांडप यंत्रात जशी खाली मिरची ठेवली जाते अन् ...