तिशीतील वर्ल्ड वाईड वेब
आज वर्ल्ड वाईड वेबचा तिसावा वाढदिवस. ८९ साली याची सुरुवात झाली. तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. पुढे याच्याशी संपर्क आला तो ९८-९९ साली जेव्हा मी एनआयआयटीचा बेसिक कॉम्प्युटर कोर्स केला तेव्हा. त्यावेळी वर्ल्ड वाईड वेबला दहा वर्ष होत आले होते. Floppy Discs माझा कॉम्प्युटरशी पहिल्यांदा संबंध आला तो केशवराज शाळेत असताना. तेव्हा शाळेने एक कॉम्प्युटर विकत घेतला होता. तिसऱ्या मजल्यावर एका खोलीत ठेवला होता. तो थंड राहावं म्हणून त्याला पडदानशीन केलं होतं. एका टेबलावर तो ठेवलेला असायचा. टीव्हीसारखा दिसणारा मोनोक्रोम मॉनिटर , त्याच्या खाली सीपीयू असायचा. सीपीयूमध्ये फ्लॉपी डिस्कस घालतात असं त्याला ऑपरेट करणाऱ्या माणसाने सांगितलं. संगणक साक्षरता वगैरे गोष्टींचं फॅड अजून सुरू व्हायचं होतं. मला मॉनिटरचं आकर्षण निर्माण झालं होतं. कारण त्यावरील प्रतिमा हलायच्या टीव्हीवरच्या प्रतिमांसारख्या सेम टू सेम. Prince of Persia आम्हाला संगणक नावाचा एक एक्स्ट्रा विषय दिलेला होता. एके दिवशी आम्हाला त्यांनी ‘प्रिन्स ऑफ पर्शिया’ गेम खेळून दाखवला. मोनोक्रोम दिसणाऱ्या त्याच्या हलत्या आक...