Posts

Showing posts from November, 2021

सायोनारा

Image
  चित्रपट समीक्षक होणे माझा कधीच उद्देश नव्हता. पुण्यात शिकायला गेलो ते वेगळीच स्वप्ने डोक्यात घेऊन. जे ठरवलं होतं ते काही जमलं नाही. स्वप्ने काही पूर्ण करता आली नाहीत. नोकरीसारख्या नसत्या फंद्यात पडलो. तिथं पण फार चमक दाखवू शकलो नाही. लहानपणापासून सिनेमे बघणे कोणत्याही भाषेतले असो हिंदी, मराठी, कन्नड, इंग्लिश, किंवा हिंदी डब केलेले एवढाच उद्देश होता. वाचायला यायला लागल्यापासून पेपर वाचणे हा नित्यक्रम असायचा त्यातही चित्रपट समीक्षा वाचायला आवडायचं. चित्रपटावर घरात चर्चा ऐकायचो. त्या चर्चा कुठल्या तरी पेपरातील चित्रपट समीक्षेवर वा दिवाळी अंकातील लेखांवर आधारित असायची. त्यातनं किस्से वजा गॉसिपचं जास्त असायचं. मला आठवतंय माझा एक आतेभाऊ  रेंचा गणशत्रू की आगंतूक  बघून आला होता तेव्हा त्यावर बरंच बोलत होता. कोणत्या तरी फिल्म क्लब की सोसायटीत त्याने बघितला होता. रे हा मोठा दिग्दर्शक आहे एवढं त्याच्या बोलण्यावरून कळलं होतं. घरात चर्चा असायच्या त्या हिंदी, मराठी गाण्यांची व संगीताची कारण त्यावेळी आम्ही व आत्याचं कुटुंब एकत्र राहत असू. त्यामुळे सगळे मिळून टीव्हीवर सिरीअल्स, सिनेमे...