Posts

Showing posts from October, 2024

अभिजात भाषा

Image
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आनंदाची गोष्टय. मला खूप आनंद झालाय अशातला भाग नाही. त्याचं कारण मला भाषेचं एक्पोजर जरी मराठीचं असलं तरी निव्वळ मराठीच माझी भाषा आहे असं मी म्हणू शकत नाहीत. किंवा माझ्यासारख्या बॉर्डर इलाख्याच्या जवळ जन्मणाऱ्या व पालनपोषण झालेल्याला भाषेबद्दल कट्टरता, अस्मिता किंवा वर्चस्व पण दाखवता येत नाही. खरं बोलायचं तर त्यासाठी माझ्या भूतकाळात व मी ज्या भौगोलिक वातावरणात वाढलो ते समजून घेणं गरजेचं आहे. माझ्या आई-वडिलांचं लग्न झालं १९७९ साली. वडिलांचं आठवी ते दहावीपर्यंतचं शिक्षण लातूरच्या राजस्थान शाळेत झालेलं. नंतर इंजिनिअरींगचा डिप्लोमा त्यांनी गुलबर्ग्याच्या (आताचा कर्नाटकातली कलबुर्गी) कॉलेजातून केलं. पुढे काही दिवस हैदराबादेत जॉबसाठी ट्राय केल्यावर मराठवाड्यात एके ठिकाणी लेक्चरर म्हणून काम केलं. त्याचवेळी एमएसईबीत जागा निघाल्या. जॉब लागला सब-इंजिनिअर म्हणून. पहिली पोस्टिंग बहुतेक नांदेडला झाली कारण आईचे मामा (आत्याचे मिस्टर) आईचं स्थळ घेऊन त्यांना भेटायला आले होते ते तिथेच. तेव्हा वडील स्वतःच स्वैपाक करायचे. त्यांनी आईच्या मामांना व सोबत आलेल्यांना चहा ...