Posts

Showing posts from April, 2015

कुंग फू किलर : डॉनी येनचा अॅक्शन तडका

Image
हाँगकाँग  चित्रपटश्रूष्टीने जगाला खासकरून अॅक्शन वर्गात बसणाऱ्या सिनेमांचे अनेक कलाकार दिले आहेत. जॅकी चॅन, मिशेल यो, सॅमो हंग, जेट ली वगैरे ज्यांनी ब्रूस ली नंतर अॅक्शन सिनेमाला वेगळा आयाम दिला. जगभरात पसरलेला स्वतःचा चाहता वर्ग तयार केला. वरील उल्लेखलेल्या कलाकारांच्या सिनेकारकिर्दीत एक नाव घ्यावं लागेल ज्याने या कलाकारांसोबत काम केले आहे तसेच त्याच्या वैशिष्टपूर्ण सिनेमांमुळे स्वतःचा चाहता वर्ग तयार केला आहे. तो म्हणजे डॉनी येन. डॉनी येनची जवळजवळ संपूर्ण कारकीर्द हाँगकाँग सिनेश्रूष्टीतच घडली असं म्हणायला काही हरकत नसावी फक्त हॉलीवूडमधले एखादे दोन सिनेमे सोडले तर...  ब्रूस लीला मार्शल आर्ट्सचे धडे देणाऱ्या ईप मॅनच्या चरित्रात्मक भूमिकेने तर तो अजून सर्वदूर पोचला.  प्रस्तुत सिनेमाचा विषय तसा नेहमीचा आहे. कुंग फू पटांचा साचा ठरलेला असतो. सुष्ट-दुष्ट असे दोन व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीत पारंपारिक संघर्ष. हाऊ मो (डॉनी येन) हा मार्शल आर्ट्समध्ये माहीर असणारा आणि पोलिसांना आत्मसंरक्षण शिकवणारा शिक्षक एका केसमध्ये शिक्षा भोगत असतो. त्याच्या शिक्षेची तीन वर्ष पूर...

कोर्ट : प्रेक्षकांसमोर प्रश्न उभे करणारे ‘कोर्ट’

Image
आपण जेव्हा सिनेमा बघतो तेव्हा त्या कडून काय अपेक्षा करतो? त्याने मोजलेल्या पैश्याला शंभर टक्के मनोरंजन द्यायला हवं. वास्तव आयुष्यातल्या कटकटी परत पडद्यावर दाखवून मोजलेल्या पैश्यांची किंमत कमी करू नये. मनोरंजन करण्यासाठी गाणी, संगीत, दीर्घकाळ लक्षात राहतील असे संवाद, नायक-नायिकांचा चकचकीत आयुष्य आणि इतर बऱ्याच गोष्टी दाखवाव्यात. जेणेकरून चित्रपटगृहाबाहेर आल्यावर त्यातील अशक्य गोष्टी वास्तव वाटाव्यात आणि तेवढ्या क्षणापुरतं ते जगणं जगायला लावावं. पैसे फिटल्याचा पुरेपूर आनंद त्याने द्यावा. या पार्श्वभूमीवर नुकताच प्रदर्शित झालेला कोर्ट वरील अपेक्षांना उतरतो का ते बघणं संयुक्तिक ठरतं. महाराष्ट्र शासन विरुद्ध नारायण कांबळे (वीरा साथीदार) या केसमध्ये पासष्ट वर्षाचे लोकशाहीर असणारे हे गृहस्थ पोवाडे गाऊन दलित चळवळीला हातभार लावत असतात. अशाच एका कार्यक्रमात त्यांना अटक केली जाते. पोलीसांचं म्हणणं असतं त्यांच्या एका गाण्यामुळे पवार नावाच्या गटार साफ करणाऱ्या सफाई कामगाराने आत्महत्या केलेली असते. त्यांचं गाणं हे आत्महत्या करायला उद्युक्त करणारं असतं. या कामी वकील व्होरा (विव...