Posts

Showing posts from December, 2016

दंगल : गीताध्याय

Image
गेल्या काही महिन्यांमध्ये ट्रेलरवरून सिनेमा कसा असेल याचे अंदाज सोशल मेडियावर मांडले की घमासान चर्चा वाचण्यात येते. निव्वळ ट्रेलरवरनं सिनेमाची यथायोग्यता तपासण्यात येऊ नये असं विरोधकांचं म्हणणं. पण सिनेमा प्रदर्शित झाल्यावर ट्रेलरवरून सिनेमा समजतो असं म्हणणाऱ्यांना तो तोंडघशी पाडत नाही. ट्रेलर उत्सुकता वाढवणारा व आशयाला समोर आणणारा असेल तर प्रेक्षक नक्कीच थिएटरमध्ये येणार. दंगलचं ट्रेलर प्रदर्शित व्हायला लागल्यावर तो चांगलाच असणार असे सकृतदर्शनी तरी वाटत होते. सिनेमा निराश करत नाही तर एक प्रेरणादायी कथा मांडतो. हरियाणामधल्या बलाली इथल्या महावीर सिंग फोगाटला (आमीर खान) घरच्या अडचणींमुळे कुस्ती सोडून नोकरी करावी लागते पण त्याचं खेळाडू मन त्याला बसू देत नाही. आपल्याला मुलगा झाला तर तो देशाला सुवर्ण पदक मिळवून देईल या आशेवर तो असतो. त्याच्या दुर्दैवाने त्याला चारही मुलीच होतात. भारतीय रिवाजानुसार त्यांना रांधा, वाढा, उष्टी काढा यातच आयुष्य व्यथित करावं लागणार व आपलं स्वप्न भंगणार असं वाटत असतानाच समवयस्क मुलांनी दिलेल्या शिव्या न सहन होऊन गीता (झायरा वासिम, लहान व फातिमा सना शेख,...

घर

ऐंशीचं दशक संपण्याच्या दोन वर्षे आधी त्या गृहस्थांनी औरंगाबादसारख्या त्यावेळच्या शहरात सिडकोमध्ये प्लॉट विकत घेऊन घर बांधणं हे दिव्यच होतं. जुन्या औरंगाबादेत मुलांसहित काढल्यावर मध्यमवर्गीय मानसिकतेला अनुसरून त्यांनी सिडकोत घर बांधण्याचा निर्णय जाहीर केला तेव्हा घरात छोटासा भुकंपच झाला. कुठे तिकडे जाता, माणसं तोडायची आहेत का वगैरे बोलणं ऐकून ते घर बांधायच्या निर्णयावर ठाम राहिले. त्यावेळी आजच्यासारखं बिल्डरला घर बांधायला देणं वगैरे नसल्यामुळे गवंड्याला हाताशी धरून घर बांधायला सुरुवात केली. त्याने त्याच्या स्वभावाला अनुसरून घर बांधलं ज्याची शाश्वती तो सुद्धा देऊ शकला नसता. त्यामुळे घरात जी आय पाईप्सचे जाळे, त्यावेळच्या पद्धतीचा किचन ओटा-सिंक, स्पंज केलेल्या भिंती, त्यांना सिमेंट कलर्स मारलेले, भिंती पुढील काळात पावसात ओल धरणाऱ्या, भिंतीत फळ्या असणारी कपाटं, छताला गिलावा नसणे, काचा बसवलेल्या/न बसवलेल्या लोखंडी खिडक्या अशा अवतारात एक बेडरूम, हॉल, किचनचं ते घर सिडकोत इतर तुरळक घरांबरोबर दिमाखात उभं राहिलं. गृहस्थांना दोन मुले व दोन मुली. मुली नेहमीप्रमाणे दिल्या घरी सुखी राहिल्या...