Posts

Showing posts from 2018

द गर्ल इन द स्पायडर्स वेब : फक्त एकदाच बघण्यासारखा

Image
‘मीटू’ मुळे बदललेल्या सध्याच्या वातावरणात या सिनेमाचं प्रदर्शित होणं योगायोग म्हणावा का? कारण याची नायिका ‘लिझबेथ सलँडर’ स्त्रियांवर अनन्वित अत्याचार करणार्‍या पुरूषांना तिच्या शैलीत शिक्षा देत असते. एका अर्थाने कायदा हातात घेऊन काम करण्याच्या पद्धतीमुळे कित्येक स्त्रिया, मुली यांचे आशीर्वाद तिच्या पाठीशी असतात. त्यामुळे ती स्टॉकहोमची व्हिजिलांती बनलेली. अत्याचारग्रस्त स्त्रियांनी ही फिल्म किंवा या आधीची डेव्हिड फिंचरने दिग्दर्शित केलेली ‘द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू’ बघितली तर त्यांना अशी लिझबेथ आपल्या इथे पण असावी असं वाटल्याशिवाय राहणार नाही. सात वर्षांनंतर त्याच मुख्य पात्राला घेऊन केलेला हा सिनेमा एका अर्थाने सिक्वेल म्हणवणारा कामगिरी मात्र समाधानकारक करतो. एका श्रीमंत व्यक्तीला त्याच्या बायकोवर अत्याचार करताना रंगेहात पकडणारी लिझबेथ सलँडर (क्लेयर फोय) सध्या स्टॉकहोममध्ये फेमस झालीय. तिच्या एका हाती कायदा घेऊन स्त्रियांना अत्याचार मुक्त करण्याचा कार्यक्रम प्रसारमाध्यमात खूप प्रसिद्ध झालाय. एकीकडे ती हे करत असतानाच तिच्या हॅकिंग करण्याच्या कौशल्याचा वापर एक कम्प्युटर प्रोग्रामर...

राझी : एक चांगला गुप्तहेरपट

Image
गैरों पे करम, अपनो पे सितम या लताच्या आवाजातील गाण्यात माला सिन्हा तिच्या मनातील भावना धर्मेंद्रला गाऊन दाखवते. सिनेमा आँखें . साल १९६८. धर्मेंद्र जरी ते ऐकत असला तरी व त्याला तिच्या भावना समजत असल्या तरी त्याच्यासाठी त्याचं काम, कर्तव्य अधिक महत्वाचं असतं. कारण तो एक गुप्तहेर असतो. आँखें काही भारतातील पहिला गुप्तहेरपट नव्हता. जेम्स बॉंडच्या डॉ. नो ने प्रेरित झालेला तेलगु सिनेमा गुडाचारी ११६ (१९६६) हा पहिला गुप्तहेरपट होता. ज्याचा रिमेक हिंदीत लगेच फर्ज नावाने बनवला गेला. त्यातलं हम तो तेरे आशिक है, सदियों पुराने हे जितेंद्र-बबितावर चित्रित झालेलं गाणं जितेंद्रच्या खास नृत्याच्या शैलीमुळे व लता-मुकेशच्या आवाजामुळे प्रचंड प्रसिद्ध पावलेलं. त्यामुळे हिंदी सिनेमाला गुप्तहेरपटाचं नाविन्य नाही. या दोन्ही सिनेमांच्या पटकथा अशा होत्या की नायकाला किंवा नायिकेला त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवण्यासाठी गाण्याचा व नृत्याचा आधार घ्यावा लागावा. अर्थात गाणेविरहित हिंदी सिनेमा हा प्रकारच तेव्हा अस्तित्वात नव्हता. त्यामुळे त्यांच्या सिनेमाच्या तार्किकतेत ते योग्यच होतं. आज प्रदर्शित झालेल...