Posts

Showing posts from March, 2021

हॅम्लेटचा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे?

Image
{२०१०-२०१९ या दहा वर्षांचा लेखाजोखा मांडावा म्हणून फेसबुकला पोस्ट टाकली होती. त्यामुळे त्यावेळी लिहिताना जे मनात होतं ते उतरवलं आहे. कदाचित आज माझ्यात बदल झाला असेल. पण म्हणून यात काहीही बदल केलेला नाही.} हॅम्लेटचा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे हा प्रश्न आम्हाला एमएला विचारला जायचा. कारण इतर शोकांतिकेतील नायकांचे ट्रॅजिक फ्लॉज लख्खपणे समोर दिसतात. मकबईथचा त्याच्या सत्तापिपासू वृत्तीत आहे. किंग लिअरला माणसांची पारख नाही. तर ऑथेल्लो संशयी आहे. त्यामुळे हॅम्लेटचा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे म्हटलं कि आपण त्याच्या इतकेच अंतर्मुख होतो. हा प्रश्न आठवण्याचं कारण माझा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे हा पडलेला प्रश्न. प्रश्न निर्माण झाला तो २०१० ते २०१९ दशक संपल्यावर. ह्या दहा वर्षात आपण काय केलं किंवा आपल्या आयुष्यात काय काय झालं याचं सिंहावलोकन करायला बसल्यावर लक्षात आलं आपल्यात व हॅम्लेटमध्ये फारसा फरक नाही. निदान विचार करण्यापुरता तरी आपल्यात व हॅम्लेटमध्ये साम्य आहे असं वाटायला लागलंय. पण त्याचं ते सुप्रसिद्ध स्वगत कितपत लागू होतंय याची मात्र शंका आहे. गेल्या दशकाचा विचार करू जाता सुरूवात २०१० पासून करावी लागेल. ...

लातूर पॅटर्न कादंबरी का दुर्लक्षिली गेली?

Image
काही दिवसांपूर्वी फेसबुकवर मित्र भारत निलखने मराठीतील दुर्लक्षित लेखक अशा अर्थाची पोस्ट टाकली होती व इमॅन्युलने मला टॅगलं होतं. त्या पोस्टमुळेच मला हे लिहावंसं वाटलं. पार्श्वभूमी २०११ मध्ये कादंबरीचं प्रकाशन झालं. यावर्षी दहा वर्ष होतील कादंबरीला. प्रकाशन झाल्यावर वाटलं होतं लवकरच सर्व थरातून तिची दखल घेतली जाईल. या विषयावर लिहिणारे पहिले आपणच म्हटल्यावर उत्साहाने वाचक त्याचं स्वागत करतील. समीक्षा होईल. पुरस्कार मिळतील. असं किमान वर्षभर तरी वाटत होतं. बऱ्याच पुरस्कारांसाठी पाठवली. राज्य ते विविध ठिकाणच्या स्थानिक पुरस्कारांना पाठवली. अगदी पुण्याच्या नगर वाचन मंदिराच्या पुरस्कारासाठी स्वतः तिथे जाऊन देऊन आलो होतो. तसेच साहित्य अकादमी युवा पुरस्कार देते ३५ वर्षांखालील लेखकांच्या पहिल्या साहित्यकृतीला. मला आता नीटसं आठवत नाही पण अक्षरमानवने किंवा की मी त्यांचा फॉर्म भरून पाठवला होता बहुदा नाही सुद्धा. त्यामुळे तो मिळेल निदान वयाच्या अटीत बसत होतो म्हणून. पण कुठून कसलाच प्रतिसाद आला नाही. कादंबरी प्रकाशित झाल्यावर पेपरात परीक्षणे/समीक्षा छापून येईल म्हणून महिनाभर प्रत्येक पेपरची रविवारची...