Posts

Showing posts with the label Alfred Hitchcock

वेलकम बॅक : निक्का टाइमपास

Image
आल्फ्रेड हिचकॉक आणि अनीस बज्मी यांच्यात एक गोष्ट समान आहे. हिचकॉक म्हणायचा पडद्यावर तुम्हाला काय दाखवायचं आहे ते महत्वाचं. अनीस बज्मीला हे मनोमन मान्य आहे. त्यामुळेच हिचकॉकचं म्हणणं शिरसावंद मानून तो सिनेमे बनवतो. अनीसची कारकीर्द बघितली तर नव्वदच्या दशकात पटकथाकार म्हणून त्याने सुरुवात केली. डेव्हिड धवनचे राजा बाबू, शोला और शबनम, स्वर्गसारख्या सिनेमांचे लेखन त्याच्या हातून घडले. नव्वदच्या दशकातला हिंदी व्यावसायिक सिनेमा वैशिष्टपूर्ण असायचा. एका नायक-एक नायिका, त्यांचं प्रेम, सुश्राव्य संगीतातली गाणी, कोरसयुक्त नाच, खास हिंदी सिनेमातच शोभतील असे संवाद, त्यात खोडा घालणारा खलनायक, त्यासाठी शेवटी नायकाने तार्कीकतेला धाब्यावर बसवून केलेली हाणामारी. असा सिद्धहस्त फॉर्म्युला आणि पॅटर्न असायचा. त्याचा परिणाम  सिंगल थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा पाऊस. त्यामुळे त्याने लिहिलेले आणि दिग्दर्शित केलेले सिनेमे फार काही वेगळे होते अशातला भाग नव्हता. नुकताच प्रदर्शित झालेला वेलकम बॅक याला अपवाद नाही हे प्रेक्षकांचं किती मोठं भाग्य. उदय शेट्टी (नाना पाटेकर) आणि मजनू (अनिल कपूर) आ...