Posts

Showing posts with the label Arun Sadhu

यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची : चरित्र नसलेला चरित्रपट

Image
माझे तीन आवडते चरित्रपट आहेत. हे चित्रपट चरित्रपट कसे असावेत याचे वस्तुपाठच आहेत (माझ्यासाठी तरी). गांधी -- रिचर्ड अॅटनबरो  चॅप्लिन -- रिचर्ड अॅटनबरो   कपोते -- बेनेट मिलर यशवंतराव चव्हाण वारले तेव्हा मी तीन वर्षांचा होतो. मी त्यांचे आत्मचरित्र वाचले नाही की त्यांचे इतर लिखाण वाचले आहे त्यामुळे हा चित्रपट मला त्यांची जुजबी ओळख करून न देता त्यांनी नेमकं काय केलं की त्यांना वादळाची उपमा देण्यात आली आहे हे दाखवेल हे बघायचं होतं. चित्रपट सुरु होतो कोणा देशमुख नावाच्या सरांच्या यशवंतरावांच्या माहिती सांगण्याने ते पण दोन शाळकरी भासावेत अशा मुलांना. त्यांना म्हणे चव्हाणांचं आयुष्य अभ्यासायचं असतं. अशा उपऱ्या कथानकाचा उपयोग करून पटकथा रचलेली आहे. त्यात मधेच यशवंतराव स्वतःच निवेदन करतात , मधेच एक पोवाडे गाणारा निवेदन करतो , पाठीमागे ठणाणा पार्श्वसंगीत चालू असतं , परत तो देशमुख मास्तर निवेदन करत असतो , एकदा तर स्वतः यशवंतराव त्या तिघांना भेट देऊन दिल्लीत त्यावेळी काय झालं याचं बौद्धिक घेऊन जातात. चित्रपटाचा शेवटपर्यंत फोकस ठरत नाही की त्याला काय दाखवायचे आहे. चित्...