यशवंतराव चव्हाण बखर एका वादळाची : चरित्र नसलेला चरित्रपट
गांधी -- रिचर्ड अॅटनबरो
चॅप्लिन -- रिचर्ड अॅटनबरो
कपोते -- बेनेट मिलर
चॅप्लिन -- रिचर्ड अॅटनबरो
कपोते -- बेनेट मिलर
यशवंतराव चव्हाण
वारले तेव्हा मी तीन वर्षांचा होतो. मी त्यांचे आत्मचरित्र वाचले नाही की त्यांचे
इतर लिखाण वाचले आहे त्यामुळे हा चित्रपट मला त्यांची जुजबी ओळख करून न देता
त्यांनी नेमकं काय केलं की त्यांना वादळाची उपमा देण्यात आली आहे हे दाखवेल हे
बघायचं होतं.
चित्रपट सुरु
होतो कोणा देशमुख नावाच्या सरांच्या यशवंतरावांच्या माहिती सांगण्याने ते पण दोन
शाळकरी भासावेत अशा मुलांना. त्यांना म्हणे चव्हाणांचं आयुष्य अभ्यासायचं असतं. अशा
उपऱ्या कथानकाचा उपयोग करून पटकथा रचलेली आहे. त्यात मधेच यशवंतराव स्वतःच निवेदन
करतात, मधेच एक पोवाडे गाणारा निवेदन करतो, पाठीमागे ठणाणा
पार्श्वसंगीत चालू असतं, परत तो देशमुख मास्तर निवेदन करत असतो, एकदा तर स्वतः
यशवंतराव त्या तिघांना भेट देऊन दिल्लीत त्यावेळी काय झालं याचं बौद्धिक घेऊन
जातात. चित्रपटाचा शेवटपर्यंत फोकस ठरत नाही की त्याला काय दाखवायचे आहे.
चित्रपटाची कथा थेट चव्हाणांच्या लहानपणापासून सुरु होते. तेथून त्यांनी काय काय
केलं याची मालिकाच चालू होते.
अशा चित्रपटांची
पटकथा हा त्याचा प्राण असतो. तुम्ही पटकथेत काय सांगणार आहात त्यावरून चित्रपटाचा
पोत ठरतो. इथे अरुण साधू हे पटकथाकार आणि संवाद लेखक आहेत. अरुण साधूंच्या मुंबई
दिनांक आणि सिंहासन या दोन कादंबऱ्या मिळून विजय तेंडुलकरांनी सिंहासन
या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. त्याचं दिग्दर्शन जब्बार पटेलांनी केलं होतं.
साधूंच्या कादंबरी लेखनाबद्दल मला आदर आहे पण त्यांनी तेंडूलकरांच्या पटकथेचा अभ्यास
केला असता तर हा चित्रपट कुठच्या कुठे गेला असता. दुर्दैवाने साधूंना पटकथा
लेखनाचा अनुभव नसल्यामुळे त्यांनी फक्त चव्हाणांच्या आयुष्यातले प्रसंग जसेच्या
तसे उचलले व एका मागून एक ते लिहिले. चव्हाणांना कुसुमाग्रज, नटसम्राट आणि
घाशीराम कोतवाल आवडतात म्हणून त्यांचे उल्लेख केलेले आहेत. चित्रपटात त्यांची जी
वादळी कारकीर्द झाली ती दिल्लीत, वेगवेगळ्या खात्याचे मंत्री झाल्यावर; त्यावर
मात्र अतिशय बाळबोध प्रसंग रचलेत. उलट हा भाग नाट्यपूर्ण असणारा आणि चव्हाण खास
नेहरूंच्या मर्जीतले त्यामुळे पुढे जेव्हा इंदिरा गांधी (अतिशय त्रोटक भूमिकेत
सुप्रिया विनोद.) राजकारणात उतरल्या व पंतप्रधान झाल्या तेव्हा त्यांच्या बरोबर
त्यांना खूप प्रसंगात तडजोड करावी लागली. नेमकं पटकथाकार आणि दिग्दर्शक या दोघांनी
चित्रपट वादग्रस्त होईल म्हणून चव्हाण आणि इंदिरा एकमेकांशी गप्पा मारत बसलेत अशा
थाटात प्रसंग घेतले आहेत. त्यावेळी देशात काय चालू होतं ते पाठीमागे न्यूज रील
फुटेज आणि जुजबी निवेदनातून सांगून टाकतात. मला इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण
यांच्या राजकीय संबंधात जास्त इंटरेस्ट होता पण ते काही यात दिसून आलं नाही.

या चित्रपटाला
सचिन कुंडलकर, रत्नाकर मतकरी, नागराज मंजुळे, निखिल महाजन आणि गिरीश
कुलकर्णी यांचा पटकथाकार म्हणून हातभार लागला असता तर चित्रपट वस्तुपाठच ठरला
असता. एकुणात जब्बार पटेलांसारखा दिग्दर्शक असून सुद्धा आजच्या प्रेक्षकांसाठी हे काय
दिलं आहे असं बघताना जाणवतं.

Comments