प्रणव सखदेव, कविता दातीर आणि बालाजी सूर्यवंशी.
जे घडून गेलं त्याचा खेद नाही पुढयात काय वाढलंय याची चिंता नाही आत्ता आहे पृथ्वीवर आहे पृथ्वी फिरतेय स्वतः भोवती सूर्याभोवती … प्रणवने लिहिलेल्या कवितासंग्रहातील एका कवितेच्या वरील काही ओळी. सर्व कविता आजच्या काळाशी निगडीत लिहिलेल्या आहेत त्यामुळे वाचायला सोप्या. माझ्यासारख्या कवितेच्या जवळ न फिरकणाऱ्या माणसाला तर यांच्यातलं फार काही कळत नाही. तसेच मराठीत सध्या कवितेत कोणता प्रवाह आहे किंवा नवं काय आहे ते पण माहित नाही. शाळेत क्रमिक पुस्तकात असणाऱ्या मराठी कविता ज्या आता आठवत पण नाहीत पण गाईडातून त्यांचे अर्थ समजून घेऊन त्यातलीच उत्तरं पाठ करून उत्तरं सोडवण्यापुरत्या वाचलेल्या. पुढे शाळा संपल्यावर अकरावीला सायन्स घेतलं, डॉक्टर होण्यासाठी. सायन्स घेतलं म्हटल्यावर सायन्स फिक्शन वाचणे ओघाने आलेच असा प्रघात नसला तरी जयंत नारळीकर, निरंजन घाटे, लक्ष्मण लोंढे यांच्या कथा-कादंबऱ्या आणि मोहन आपटे, बाळ फोंडके यांची वैज्ञानिक पुस्तके वाचायचा छंद लागला. डॉक्टरीला जाता आलं नाही कारण तेवढा अभ्यासच नव्हता. त्यामुळे मग कॉमर्स परत यु टर्न मारून बीएस्सी करत करत दोन्ही ठिका...