Posts

Showing posts with the label Brahmin

मी एक ब्राह्मण

Image
सन १९९५-९६ मध्ये मी दहावीला होतो. प्रकृती तोळामासा असल्यामुळे वडिलांनी शाळेला व ट्युशन-क्लासला जाण्या-येण्यासाठी ऑटो लावला. साधारण डिसेंबरपर्यंत ऑटो होता. नंतर प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली म्हणून तो बंद केला. वार्षिक परीक्षेच्यावेळी सायकलवर परीक्षेला जाण्याचा त्रास होईल म्हणून परत त्या ऑटोवाल्याला बोलवायला त्याच्या घरी गेलो. त्याचं घर लातुरात जुन्या औसा रोडवर मराठवाडा ग्रामीण बँकेच्या जवळ होतं. घरासमोर सायकल लावून एका छोट्या दरवाज्यातून बोळकंडीवजा जागेतून आत गेलो. समोर दोन मध्यमवयीन बायका बोलत बसल्या होत्या. त्यातल्या एकीला ऑटोवाल्याला घरी पाठवून द्या म्हणून सांगितलं. तिनं माझं नाव विचारलं. मी सांगितल्यावर ती चटकन म्हणाली, "म्हणजे बामनाच्या घरी का?" तेव्हा काय उत्तर दिलं ते आठवत नाही पण तिचं अगदी सहज जातीबद्दल बोलणं मनात रुतून बसलं. घरी आल्यावर वडिलांना घडलेलं सांगितलं. ते म्हणाले हे असंच आहे. आजकाल ब्राम्हणांविरुद्ध असंच बोललं जातं. मला हे असंच बोललं जातं वाक्य आजही खटकतं. ब्राह्मण जातीत जन्मलो म्हणजे नक्की काय केलं ते कळत नाही. तसेच इयत्ता चौथीत असताना संत नामदेवांन...