Posts

Showing posts with the label Carrie-Anne Moss

मेट्रिक्सची पंचवीशी

Image
  १९९८-९९ हे माझ्या बीकॉम फर्स्ट ईयरचं वर्ष. कॉलेज राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर. १२ सायन्समध्ये ५०% घेतल्यामुळे पुढे बीएस्सी करण्याची इच्छा नव्हती. मग घरचे म्हणाले बीकॉम करून सीए हो. (लो ऐम इज क्राईम) तर शाहू कॉलेजात अॅडमिशन घेतलं. सोबतच काहीतरी टेक्निकल शिकायला हवं म्हणून एनआयआयटीचा कोर्स करायला सांगितलं. तिथे घेतलं अॅडमिशन. तेव्हा लातुरात नुकताच एनआयआयटी चालू झालेलं. कम्प्युटरबद्दल आकर्षण केशवराज शाळेत असतानाच निर्माण झालेलं. शाळेत असणाऱ्या मोनोक्रोम मॉनिटरवर ‘प्रिन्स ऑफ पर्शिया’ बघितलेला. एनआयआयटीत एमएस डॉस व विंडोज शिकायला मिळाले. त्यामुळे कम्प्युटरचं जग काय भानगड असते ती कळायला लागली होती. त्याच्या पुढच्या अॅडव्हांस कोर्सला अॅडमिशन घेतलेली. एचटीएमएल, एसक्यूएल, सी, सी++, जावा व इतर गोष्टी शिकायला सुरूवात झालेली. पण ते इन्स्टीट्युट बंद पडलं त्यामुळे कोर्स तिथेच बंद पडला. (आणि जग एका मोठ्या व श्रेष्ठ दर्जाच्या प्रोग्रॅमरला मुकलं. नाही तर ‘९९ साला नंतरचे कम्प्युटर प्रोग्रामिंगशी निगडीत सगळे शोध मीच लावले असते.) हॉलीवूड सिनेमाचं दालन उघडलं गेलं ’९३ सालच्या ज्युरासिक पार्कमुळे. क...