Posts

Showing posts with the label Farhan Akhtar

वजीर : एक डाव वजिराचा

Image
बुद्धिबळात कशाला महत्व असते चालींना की प्रतिचालींना! चाली खेळणारा शेवटी चेकमेट म्हणतो की प्रतिचाली खेळणारा. ज्याने कुणी पहिल्यांदा चेकमेट म्हटले त्याने खेळ जिंकला असा बुद्धिबळाचा सरळ हिशोब असतो. हाच हिशोब प्रत्यक्ष आयुष्याला लावता येईल. बुद्धिबळाच्या चाली आयुष्यातल्या घटनांचा मागोवा काढण्यासाठी वापरता येतील. बुद्धिबळात खेळ जिंकणे इतकेच अंतिम असते तेव्हा त्यासाठी केल्या गेलेल्या चाली-प्रतीचालींना महत्व ते किती राहते. प्रतिस्पर्धी असणाऱ्या भिडूची मानसिकता याने भेदता येते . या प्रश्नांची उत्तरे कदाचित प्रत्यक्ष आयुष्यातल्या घटनांना लावता येणार नाहीत. आयुष्यातील कटू प्रसंग इतके सहजासहजी सुटणार नाहीत तरीही ते शक्य होऊ शकतं जर त्याचा विचार केला गेला असेल तर. निदान विधू विनोद चोप्रा व बिजॉय नाम्बियार यांनी तसा विचार केलेला दिसतो. दानिश अली (फरहान अख्तर) हा एटीस ऑफिसर आपली बायको रुहाना अली (आदिती राव हैदरी) व मुलगी यांना घेऊन गाडीतनं निघाला आहे. एके ठिकाणी रुहानाच्या तुटलेल्या घुंगरांना शिवण्यासाठी एका संगीत वाद्ये विकणाऱ्या दुकानासमोर थांबतात. दानिशला तेवढ्यात रस्त्याच्या पलीकडे ...