Posts

Showing posts with the label Frank Martin

ट्रान्सपोर्टर रिफ्यूइल्ड : परत एकदा फ्रँक मार्टिन

Image
२००२ साली जेसन स्टेथमचा ट्रान्सपोर्टर आला तेव्हा कुणालाही कल्पना नव्हती तो खूप मोठा हिट ठरेल. द हायर ही बीएमडब्ल्यू कंपनीने त्यांच्या कार्सच्या प्रोमोशनसाठी छोट्या सिनेमांची मालिका निर्मिती केली होती. ती जगातल्या त्या वेळेतल्या सर्वात चांगल्या दिग्दर्शकांना घेऊन उदा. जॉन वू, गाय रिची इ. हायरची कल्पना अशी होती एक ड्रायव्हर असतो त्याला वेगवेगळी असायनमेंट्स दिली जातात. त्याला ती पार पाडणे गरजेचे असते. क्लाइव ओवेनने दुसऱ्या सिरीजमध्ये ड्रायव्हरची भूमिका केली होती. ती मालिका किती प्रभावी होती हे जॉन वूने दिग्दर्शित केलेल्या द हॉस्टेज बघून येईल. ल्युक बेसनने वरील मालिका बघून आठ दिवसात ट्रान्सपोर्टरची पटकथा लिहिली. जेसन स्टेथमला फ्रँक मार्टिन साठी लुईस लॅटिएर आणि कोरी युएनच्या हाती सोपवलं. नंतर काय घडलं हे सांगणे न लागे. पहिला भाग प्रचंड यशस्वी झाल्यामुळे दुसरा आणि तिसरा भाग काढून त्याची स्वतंत्र मालिकाच बनवण्यात आली. तसेच एक टीव्ही सिरीजसुद्धा बनवली गेली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रान्सपोर्टर रिफ्यूइल्डमध्ये फ्रँक मार्टिनला रिबूट करून मालिकेची यशस्विता खेचून आणण्याचा प्रयत्न आहे. ...