जॅकी चॅन आणि मी
जॅकी चॅन माझ्या आयुष्यात कधी आला ते नेमकं आठवत नाही पण माझ्या वडिलांना व एका आतेभावाला तो प्रचंड आवडायचा . लातुरात तेव्हा उषाकिरण , रत्नदीपसारखे थिएटर्स फक्त याचेच सिनेमे दाखवायचे किंवा हाँगकाँगचे कुंग - फू कराटेचे सिनेमे दाखवायचे . जॅकी चॅन सोबत सॅमो हंग , युआन बियू , मिशेल यो या व ईतर अॅक्शन जॉनराला वाहिलेल्या नटनटींचे सिनेमे यायचे पण सटीसामाटी . जॅकी चॅन मात्र त्या दोघांना खूप आवडायचा . ते दोघं चित्रपट आला की आवर्जून बघायला जायचे . मला आठवतय मी त्याचा पहिला चित्रपट बघितला तो प्रोजेक्ट ए भाग दोन . हा चित्रपट प्रोजेक्ट ए चा सिक्वल होता परंतु फक्त कथानायक जॅकी चॅन सोडला तर ईतर महत्त्वाचे कलाकार युआन बियू व सॅमो हंग नव्हते . तरीपण तो लक्षात राहिला त्यातल्या अॅक्शन प्रसंगांसाठी . त्यात शेवटाकडे एक प्रसंग आहे . जॅकीला पकडून एका मोठ्या कांडप यंत्रात ठेवले जाते अन् कांडप यंत्र चालू केलं जातं . कांडप यंत्रात जशी खाली मिरची ठेवली जाते अन् ...