Posts

Showing posts with the label Mandana Karimi

क्या कूल है हम ३ : अबघणीय

Image
काही सिनेमे का बनवले जातात याला उत्तर नाही. आर्थिक ताकत आहे म्हणून की सृजनशीलता ओसंडून वाहतेय म्हणून. याचं नेमकं उत्तर मिळणं अवघड आहे. कारण सृजनशीलता असली तरी तिला योग्य दिशा असणं अपेक्षित आहे. तिच्यात गांभीर्य हवं भलेही मांडला जाणारा विषय विनोदी असला तरी. निर्मात्याच्या विचारात गांभीर्य नसेल तर ते बाळबोध होतं. ते एकतर स्वतःच्या प्रेमात पडलेत असं म्हणता येईल किंवा आपण ज्यांच्यासाठी सिनेमा बनवलाय त्यांना त्यांनी गृहीत धरलंय असं म्हणता येईल. यातल्या दोन्हीही शक्यता नाकारता येत नाही. एकता कपूर व शोभा कपूर निर्मीत व उमेश घाडगे दिग्दर्शित क्या कूल है हम ३ हा अशाच सृजनशीलतेचं उत्तम उदाहरण ठरावा असा सिनेमा आहे. कथेनुसार कन्हय्या (तुषार कपूर) व रॉकी (आफताब शिवदासानी) हे दोन मित्र त्यांचा मित्र मिकी (कृष्णा) याच्या अडल्ट सिनेमात हिरोचं काम करत असतात. कन्हय्याचे त्याच्या वडिलांशी (शक्ती कपूर) जमत नसते. इकडे सिनेमात काम करता करताच तो शालूच्या (मंदना करिमी) प्रेमात पडतो. तिचं प्रेम मिळवण्यासाठी तो त्याच्या सिनेमातील अभिनेत्यांना घेऊन एक नाटक रचतो तिच्या बापावर सूर्या करजात्यावर (दर्शन जर...