एअरलिफ्ट : दिग्दर्शनातील नवखेपणा शौर्यकथेच्या मुळाशी
१ ऑगस्ट १९९० ला इराकने कुवैतवर अचानक हल्ला केला. कारण उघड होतं दुसऱ्या महायुद्धानंतर कच्च्या तेलाला आलेलं अनावश्यक महत्व, जागतिक सत्ता हवी असेल तेलावरील सार्वभौमत्व अंगीकारणं गरजेचं होतं सोबत अमेरिकेला शह देणे सुद्धा. त्याचाच एक भाग म्हणून सद्दाम हुसैननी कुवैतवर हल्ला केला. पुढे अमेरिका त्यात सामील झाली जे आज गल्फ वॉर म्हणून परिचीत आहे. त्याच काळात कुवैतमध्ये असणाऱ्या काही लाख भारतीयांनी जीव मुठीत घेऊन तिथनं निघायचा प्रयत्न केला. या प्रयाणात इंडिअन एअरलाईन्सने खूप मोठी जबाबदारी घेऊन जवळ जवळ सर्व भारतीयांची सुटका केली. त्यांना यासाठी एकोणसाठ दिवस व चारशे अठ्ठ्याऐंशी फ्लाईट्स कराव्या लागल्या. याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली. एअरलिफ्ट त्याच शौर्याची कथा एका कुटुंबाला केंद्रस्थानी ठेऊन दाखवतो. रणजीत कटीयाल (अक्षय कुमार) हा भारतीय पण स्वतःला कुवैती समजणारा श्रींमंत उद्योगपती त्याच्या आयुष्यात खुश आहे. कुवैती सरकार मधल्या वरिष्ठांशी जवळकीचे संबंध ठेऊन तो उद्योगधंदा वाढवण्यात मश्गुल आहे. त्याला भारतीयांचा व भारतातील भ्रष्टाचाराचा तिटकारा आहे. त्याची पत्नी ...