Posts

Showing posts with the label Shivaji Lotan Patil

क्वीन : आशयात श्रीमंत आणि धग : अपुऱ्या पटकथेचा बळी

Image
आपण आयुष्य जगताना एका विशिष्ट वर्तुळात जगतो. आपल्या परिघात जेवढं येईल ते जसंच्यातसं स्वीकारतो. या सिनेमातल्या राणीचं आयुष्य तसंच आहे. ती तिच्या आयुष्यात आलेल्या एका युवकाला मनोमन आपला मानते व ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी तो नकार देतो. मग ती काय करेल ??? तर ती स्वतःला एका खोलीत बंद करून घेते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठते तोपर्यंत घरचे परेशान झालेले. ती त्यांना म्हणते मला माझा हनीमून साजरा करायचाय , एकट्याने!!! घरचे तिची मानसिकता बघून तिला जा म्हणतात. ती तिथेच जाते जिथे तिच्या नवऱ्याने हनीमूनसाठी तिला न्यायचं ठरवलेलं असतं , पॅरिस ला. पुढे काय होतं ते पडद्यावर बघा. एक अशक्य वाटणारी घटना उत्तम पटकथेद्वारे कशी सांगितली जाते याचं या वर्षीचं उत्तम उदाहरण. या सिनेमात दोन गोष्टी मस्त जुळून आलेल्या आहेत त्या म्हणजे कंगनाचा गोळीबंद अभिनय आणि पटकथाकारांनी भारतीय मनोवृत्तीची पकडलेली अचूक नस. सिनेमा जितका गंभीर आहे तितकाच विनोदी आहे. पण इथला विनोद चिक्कार हसवतो पण त्या पाठीमागची एका भारतीय स्त्रीची होणारी कुचंबणा तितक्याच समर्पकपणे सोबतच्या प्रसंगात दाखवतो. जे बऱ्याचदा अंतर्मुख करतो. आपण भारतीय...