रिमोट
माझ्या एक मित्र नेहमीप्रमाणे संध्याकाळी शाळेतून घरी आला. हात-पाय-तोंड धूऊन गप्पा मारायला बसला. बोलता-बोलता म्हणाला खूप दिवसात डोशे खाल्ले नाहीत. नंतर तो काय बोललाय ते विसरून गेला. सकाळी नाश्त्याला डोशे हजर. त्याला आश्चर्य वाटलं.बर्याच दिवसांनी भेटल्यावर मला आवर्जून सांगितलं. मला प्रथम लक्षातच आलं नाही. त्यांनच स्पष्टीकरण दिलं. तो म्हणाला लातूरला परत कायमचा आल्यापास्न आणि घराची सर्व जबाबदारी शिरावर घेतल्यापास्न घरातील निखळ संवादच संपलाय. तो जे काही बोलतो ते आदेशात रूपांतरित होतय. पैसे कमवून आणणे हे एकमेव काम करत असल्यामुळे त्याचं एकाधिकारशाहीत परिवर्तन झालय. संवाद फक्त एकाच बाजूने होतोय. मला प्रश्न पडला यालाच भारतीय समाजव्यवस्थेची पुरुषसत्ताक मानसिकता म्हणायची का? नंतर मी माझ्या इतर मित्रांच्या आयुष्याचा विचार करायला लागलो तेव्हा थोड्याफार फरकाने हेच चित्र मला दिसून आलं. प्रथम एक नमूद करतो मी ज्या वर्तुळात वावरतो तिथे आई-बहीण-बायको या घरातल्या स्त्री वर्गाने नोकरी/व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभं राहणे अक्षम्य गुन्हा मानला जातो. करियरफ़िरियर तर दूरची बात राहिली. यांच्या घरातील बायका उच्चविद्याविभूषित असतात तरी. अश्या पद्धतीने पुरुषांकडे आपल्या इथे पाहिलं जात असेल तर जेव्हा संध्याकाळी असा पुरुष थकूनभागून आल्यावर मनोरंजन व्हावं म्हणून हातात रिमोट घेतो
आणि त्याला आवडेल तेच बघतो तेव्हा ते समर्थनीय ठरतं का? आपल्या इथे रिमोट स्त्रियांकडेच असतो असं सांगितलं जातं ते खरं आहे का? तसेच माझे मित्र धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत ते दारू पिणे, सिगरेट ओढणे, गुटखा-तंबाखू खाणे किंवा व्यसनं करणे हे सर्रास करतात पण त्यांच्या या वागण्यावर चकार बोललं जात नाही किंवा त्यांच्या वागण्यात सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न केले जात नाहीत. यामुळेच त्यांच्यातला भारतीय पुरुषसत्ताक व्यवस्थेतला पुरुष मोठा केला जातो का? कारण माझ्या वडिलांच्या पिढीचे जवळपास सर्व पुरुष असेच होते. आम्ही त्यांच्या गादीचा वारसा चालवतोय का? मग आपण सुधारलो आहोत हे कोणत्या आधारावर म्हणायचं? उच्चविद्याविभूषित असण्याचं याच्याशी काही संबंध आहे का?

Comments