Posts

Showing posts from June, 2015

वेलकम जिंदगी : अति झालं हसू आलं

Image
चित्रपट समीक्षेचा सतरा-अठरा वर्षांच्यावर अनुभव, फिल्ममेकर्स, सिनेमॅटिक व चौकटीबाहेरचा सिनेमा अशी सिनेमाविषयक तीन पुस्तके, सकाळ साप्ताहिकमध्ये सलग सहा वर्ष चालवलेलं आणि उभ्या महाराष्ट्रात वाचकप्रिय असणारं हॉलीवूड-बॉलीवूड हे सदर ज्यातील लेखांचं दोन भागातलं त्याच नावाचं पुस्तक यावर्षी अपेक्षित, इन्व्हेस्टमेंट या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपटाचे सह-दिग्दर्शक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये परीक्षक म्हणून काम, शॉट नावाची लिखित व दिग्दर्शित शॉर्ट फिल्म जी स्टूटगार्ट आणि नुकत्याच झालेल्या मुंबईच्या कशिश शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवण्यात आली त्याचे निर्माते, खिडक्या अर्ध्या उघड्या या कथा-कादंबरीच्या आत बाहेर असणाऱ्या पुरस्कार प्राप्त कथा-कादंबरीचे लेखक, व्यवसायाने आर्किटेक्ट असे गणेश मतकरी जेव्हा प्रत्यक्ष एका व्यावसायिक सिनेमाच्या पटकथा या अत्यंत महत्वाच्या बाजूने असतात तेव्हा त्याला निश्चितच वजन आणि दृष्टीकोन प्राप्त होतो. बघुयात त्यांनी आणि दिग्दर्शकाने ते कसे पेललं आहे. मीरा सबनीसच्या (अमृता खानविलकर) हातात झोपेच्या गोळ्यांची ब...

एबीसीडी २ : ‘नृत्य’ सुखद

Image
हिंदी व्यावसायिक सिनेमात नृत्य आणि संगीत याचा सिनेमाच्या सुरुवातीच्या काळापासूनचा संबंध. एकवेळ कथा, कथानक, संवाद, अभिनय इत्यादी गोष्टी कमी आणि दुय्यम असल्या तरी चालतील पण कर्णमधुर संगीत, उत्तम नृत्य बसवलेली गाणी हवीतच. ही गाणी सिनेमाच्या आशयात मुरली नाहीत तरी चालतील पण ती हवीच. गेल्या कित्येक दशकांपासून हे चालत आलेलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एबीसीडी २ या पहिल्या एबिसीडीचा (२०१३) पुढील भाग असणाऱ्या सिनेमात वरील बऱ्याच बाबी अधोरेखित झाल्या आहेत. पुढील भाग म्हणजे पहिल्या भागाचा सिक्वल असेल असा अंदाज केला असेल तर चित्रपटकर्ते तो फोल ठरवतात कारण दोन पात्र पहिल्या भागातली असली तरी ही कहाणी त्यांची नाही. सुरेश (वरूण धवन) आणि विनी (श्रद्धा कपूर) हे हिप हॉप या पाश्चात्य नृत्य प्रकारात स्वतःचं आयुष्य घडवणारं जोडपं. त्यांचा एक डान्स ग्रुप आहे मुंबई स्टनर्स नावाचा. ते हम किसी से कम नहीं या टीव्हीवरच्या रिअॅलिटी डान्स शोमध्ये भाग घेतात. तिथे त्यांचं सादरीकरण होतं. परीक्षक त्यांनी फिलिपिनो ग्रुपचा अॅक्ट जसाच्या तसा कॉपी केलेला असतो म्हणून त्यांना चिटर्स ठरवून स्पर्धेतनं बाजूला करतात....

ज्युरासिक वर्ल्ड : चित्तचक्षुचमत्कारिक राईड

Image
१९९३ साली आलेल्या ज्युरासिक पार्क हा स्टीवन स्पीलबर्गच्या कारकिर्दीतला एक महत्वाचा चित्रपट. त्याचा प्रभाव जागतिक सिनेमावर जसा पडला तसा सर्वसामान्य प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगाची सफर त्याने घडवून आणली. डायनोसॉर हे महाकाय प्राणी कधी काळी पृथ्वीवर वावरत होते आणि त्यांचे वंशज म्हणजे आजचे जमिनीवरील आणि पाण्यातील प्राणी इतकी माहिती शाळेतल्या पुस्तकातून सर्वांना होतीच. तरी पण ते दिसतात कसे, ओरडतात कसे, त्यांचं वागणं कसं असेल वगैरे गोष्टींचा अनुभव शालेय पुस्तके देऊ शकत नव्हती. स्पीलबर्गच्या ज्युरासिक पार्कने ते काम केलं. हे प्राणी असतात कसे याची देही याची डोळा सर्वांना प्रचिती आणून दिली. त्यामुळे त्यांच्याबद्दल असणारं गूढ कमी झालं. अर्थात सिनेमाला असणारा भक्कम कथा-पटकथेचा, शास्त्रीय माहितीचा आधार, स्पीलबर्गची विषय हाताळण्यातली हातोटी यामुळे सिनेमा वारेमाप प्रसिद्ध झाला. पुढे यथावकाश त्याने दुसरा आणि तिसरा भाग काढला. आता नुकताच चौथा भाग प्रदर्शित झाला आहे. सायमन मसवाणी (इरफान खान) हा एका कॉर्पोरेट कंपनीचा मालक ज्युरासिक पार्क जे की आता ज्युरासिक वर्ल्ड आहे ही थीम पार्क चालवत असतो...

दिल धडकने दो : प्लुटोचं कुटूंब

Image
कुठल्याही कथानकाला निवेदक असावा का? असल्यास तो कोण असावा म्हणजे कथेतलं एक पात्रच ते असावं का? पात्र असेल तर तो कोण असावं मानवी व्यक्तिरेखा की अजून कुणी? जर निवेदन त्या पात्राच्या दृष्टीकोनातून असेल तर त्याचं कथानकात स्थान किती असावं? निवेदन करताना त्याने त्याच्या दृष्टीकोनातनं करावं की सर्वसाक्षी व्हावं. निवेदाकाबद्दल इतके प्रश्न पडायचे कारण या सिनेमाचा निवेदक. निवेदक हा एक जिवंत मनुष्यप्राणी असावा असा अलिखित नियम झालाय. या सिनेमात निवेदक एक कुत्रा आहे. ही कहाणी आहे मेहरा कुटुंबाची. जे पंजाबी आहेत. प्लुटो त्यांचा कुत्रा कहाणी सांगायला सुरुवात करतो. त्याच्या म्हणण्यानुसार कमल मेहरा (अनिल कपूर) हे आयका या कंपनीचे मालक, चालक आहेत. ते दिल्लीतल्या अतिश्रीमंत वस्तीत राहतात. त्यांचा कुटुंब चौकोनी आहे म्हणजे बायको नीलम (शेफाली शाह), मुलगी आयेशा (प्रियांका चोप्रा) आणि मुलगा कबीर (रणवीर सिंग). पण त्यांच्यात अतिपरिचयात अवज्ञेमुळे विसंवाद झालाय जो कमी व्हायला तयारच नाही. मेहरांच्या लग्नाचा तिसावा वाढदिवस जवळ येऊन ठेपलाय. तसेच कंपनीत हलाखीची परिस्थिती आलीय. कंपनीला सावरायचं असेल तर तिचे ४...