Posts

Showing posts from December, 2019

आजच्या श्रावणबाळांचं दुखणं -- भाग ३

गेली काही एक हजार वर्षांपासून आई-वडिलांची थोरवी इथे सांगितली जाते मग आज एकविसाव्या शतकात असा विरोधाभास का दिसून येतो? पाच हजार वर्षांच्या संस्कृतीचे ढोल वाजवत असताना आपण आजूबाजूला दिसणारं वास्तव का विसरतो आहोत? त्याचं एक कारण आमच्या पिढीच्या आई-वडिलांना संवाद साधण्याची कलाच अवगत नाही. एक उदाहरण देतो. लातुरातील बऱ्याच समवयस्क मित्रांशी बोलताना असं लक्षात आलं की खूप जणांना त्यांच्या वडिलांना किती पगार होता हेच माहिती नव्हतं. वडिलांची निवृत्ती झाली तरी त्यांना ते माहिती नव्हतं. आता यामागे काय कारण असेल तर आपल्या मुलांना आपल्या पगाराविषयी सांगू नये ही भावना. पण ही भावना का निर्माण झालेली? आमच्या आई-वडिलांची पिढी ही पुरूषप्रधान व्यवस्था मानणारी व अवलंबवणारी. त्यामुळे घरात जेव्हा मुलांशी संवाद साधला जायचा तेव्हा मुलांनी वडीलांचा आदर ठेवूनच बोलायचं असा शिरस्ता असायचा. त्यामुळे वडील किती पगार घेतात हे कधीच विचारायचं नाही हा दंडक असायचा. मुलांशी पगाराबद्दल बोललं तर ते कमीपणाचं असतं त्यांना वाटत असावं. हा संस्कार त्यांच्यावर दोन कारणांचा आहे. पहिला त्यांची जडणघडण झालेला काळ. साधारण १९५० ते ७०...

आजच्या श्रावणबाळांचं दुखणं -- भाग २

तिच्या वावराने घरात बदल घडायला लागतात. ती नोकरी करणारी असेल तर अशा काही वस्तूंची घरात प्रवेश होतो ह्या कधी बघितलेल्या नसतात. तिला नवीन कपडे, फॅशन, कानातले घालण्याची सवय असते किंवा सासरी आल्यावर मनसोक्तपणे करावे असे वाटते. वावगं काहीच नसतं त्यात. नवऱ्याला आवडत असेल तर तिने ते करायला काहीच हरकत नाही. पण सासू-सासऱ्यांना ते आवडत नाही. कारण त्यांनी कधीच आपल्या मुलीला फॅशन करू दिलेले नसते. आपल्या मुलामुलींनी आपल्या धाकात, आज्ञेत राहायला पाहिजे असं वाटत असतं. त्यामुळे ते तिच्या कपड्यांवर शेरेबाजी करायला लागतात. मुलं सुरुवातीला दुर्लक्ष करायला लागतात. आई-वडील वागायला असेच आहेत म्हणून या बाबींकडे कानाडोळा करतो. पण घरात कुरबुरी वाढायला लागतात तेव्हा तो आई-वडिलांना बोलतो. त्यामुळे वाद व्हायला लागतात. सुनेमुळे वातावरण बिघडायला लागतं. याचं खापर तिच्यावरच ओढलं जातं. मुलगा-सून व आई-वडील यांच्यात दरी निर्माण होते. बोलणं जुजबी व्हायला लागतं. मुल वाढायला लागतं. तशी आई-वडिलांची लुडबुड वाढते. मुलांच्या संगोपनाचे निर्णय घेण्याचा हक्क त्याच्या/तिच्या आई-वडिलांना असतो पण त्यातही आमच्या पिढीचे आई-वडील लक...

आजच्या श्रावणबाळांचं दुखणं -- भाग १

आजच्या श्रावणबाळांचं दुखणं असं म्हणतो तेव्हा मला सध्याच्या काळात जगणाऱ्या माझ्या वयाच्या व जे पंचवीस ते पस्तीस या वयोगटात आहेत ते तरुण अपेक्षित आहेत. तसेच पंचविशीच्या खालचे सुद्धा यात येतात. आमच्या पिढीचं दुखणं मांडण्या आधी आम्ही कोणत्या पिढीत जन्मलो हे जाणून घेणं गरजेचं आहे. चर्चेपुरतं मी ज्या लातूर शहर व परिसरात वाढलो त्याचा हवाला देणार आहे. माझं असं मत आहे की आमचा मराठवाडा हा भारतीय समाजाची एक पेट्री डिश आहे जिच्यात आपण कसलंही कल्चर तयार करून त्याचा अभ्यास करू शकतो. प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीकरिता एक कल्चर तयार करून त्याचा अभ्यास करता येईल. कारण मराठवाड्याचा संपूर्ण भूभागच भारतीय समाजाचा एक अत्यंत ज्वलंत, जिवंत तुकडा म्हणून देखील बघता येईल. किंवा असे म्हणता येईल की भारतीय मानसिकतेचा उभा छेद घेतला तर मराठवाडा त्याचं उत्तम उदाहरण ठरेल ज्यात सर्व प्रकारचे नमुने, वृत्त्या-प्रवृत्त्या दिसून येतील. एका अर्थाने मराठवाडा हे भारतीय समाजाचं जीवशास्त्रीय कल्चर आहे असं म्हणायला हरकत नाही. पार्श्वभूमी आमच्या पिढीचा जन्म कधी झाला हे जाणून घेण्याआधी आमच्या आई-वडिलांची पिढी कधी जन्मल...