नोलनचा आवडता काळाचा खेळ
एका संस्थेसारख्या वाटणाऱ्या इमारतीत प्रोटॅगनिस्ट माहिती गोळा करण्यासाठी जातो. तिथे त्याला कळतं की तिसरं महायुद्ध चालू झालंय पण वर्तमानकाळात नाही तर भविष्यातल्या लोकांमुळे. त्यासाठी काही गोष्टी समजावून घेणं गरजेचं असतं. तिथली एक वैज्ञानिक त्याला एक प्रात्यक्षिक करायला लावते. त्याला असं का झालं याचं उत्तर मिळतं कारण एका मिशनमध्ये त्याने व्युत्क्रम ( inversion ) थोडक्यात उलट्या क्रमात गोष्टी प्रवास करतायत (इथे बंदुकीतल्या गोळ्या) हे अनुभवलेलं असतं. हा प्रसंग नायकासहित प्रेक्षकांना सिनेमात काय घडणारे याची बेसिक आयडिया सांगतो. पण त्यामुळे समोर दिसणारं कथानक पूर्णपणे उलगडलं आहे असं होत नाही. त्यासाठी संपूर्ण सिनेमा खूप लक्षपूर्वक पहावा लागतो. युक्रेनच्या किएव्हमध्ये प्रोटॅगनिस्ट (जॉन डेव्हिड वॉशिंग्टन) एका अंडरकव्हर ऑपरेशनमध्ये भाग घेतो. तिथे त्याला बंदुकीतल्या गोळ्या उलट्या क्रमाने जाताना पहिल्यांदा बघायला मिळतात. पण मर्सिनरीजकडून तो पकडला जातो. त्याचा छळ होतो. आपल्या सहकाऱ्यांची नावे सांगायची नाही म्हणून तो सायनाइड कॅप्सूल खातो पण वाचतो. ती कॅप्सूल खोटी असते. ते एक टेस्ट असतं ज्यात तो पास...