फितूर : ये दिल मांगे मोअर
एखादी साहित्यकृती सिनेमासाठी रुपांतरीत करताना त्यातल्या कथानकाला धक्का न लावता तिचे काळानुरूप रुपांतर करण्यात यावे हे अपेक्षित असते. वर्तमान प्रेक्षकाला साहित्यकृतीच्या त्यावेळच्या काळाशी निगडीत कथानक दाखवण्यात आले तर कदाचित ते भावेल का नाही हे सांगणं मुश्कील आहे. त्या ऐवजी त्याला वर्तमानकाळाचा संदर्भ दिला तर तो तादात्म्य पावू शकतो. त्या बरोबरच साहित्यकृतीचं कालातीत असणं सुद्धा तपासता येतं. चार्ल्स डिकिन्सची ‘ग्रेट एक्स्पे क्टे शन्स’ अशीच एक गाजलेली साहित्यकृती. पटकथाकार-दिग्दर्शक अभिषेक कपूर याने काश्मीरच्या पार्श्वभूमीवर तिचं कथानक मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नूर (मोहम्मद अब्रार/आदित्य रॉय कपूर) काश्मीरमध्ये आपल्या मोठ्या बहिणीकडे राहत असतो. त्याला चित्रकलेची आवड असते. तसेच बहिणीच्या नवऱ्याला त्याच्या कामात मदत करत असतो. कामानिमित्त तो एकदा अंजुमन या हवेलीत जातो जिथे हजरत बेगम (आदिती राव हैदरी/तब्बू) तिची मुलगी फिरदौस (तुनिषा शर्मा/कतरिना कैफ) हिच्यासोबत राहत असते. नूरला बघून बेगम त्याला आपल्या तबेल्यातील घोड्यांना सांभाळायचं काम देते. नूर व फिरदौस यांच्यात मैत्री सोबत अ...