राजवाडे अॅण्ड सन्स : वर्तमानकालीन पुण्याचा तुकडा
मराठी सिनेमात शहराला केंद्रस्थानी ठेवून कथानक दाखवणारे सिनेमे तसे कमीच आहेत किंवा नाहीतच म्हणायला हरकत नाही. मुंबई महानगराची कहाणी सांगणारे हिंदी सिनेमे बनवले असले तरी तिच्या अंतरंगात शिरून त्यातील वृत्ती-प्रवृत्तीवर प्रहार करणारे किंवा तिची रोमँटिक बाजू दाखवणारे असंख्य येत असतात किंवा आहेत. पण इतर शहरांना त्यांचं व्यक्तिमत्व असतं. त्यांचा इतिहास असतो. तिथे वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्याचा आयाम वेगळा असतो. काही गोष्टी सर्वत्र सारख्याच असतात उदा. कोलगेट पेस्ट. तरीही त्या ठिकाणचं स्थान माहात्म्य असतं ते त्या त्या ठिकाणालाच लागू होतं. उदा. पुणे शहर. पुणे शहराबद्दल खूप काही सांगावं लागू नये इतकं ते मराठी/भारतीय भावविश्वाशी जोडलं गेलं आहे. कधी जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट होण्याच्या तर कधी भांडारकर संस्थेवरच्या हल्ल्याने किंवा कधी ते अतिरेक्यांचं स्लीपर सेल असण्याच्या कारणाने किंवा सांस्कृतिक राजधानी असं बिरुदावली मिरवण्याच्या किंवा ऐतिहासिक काळापासून महत्वाच्या असंख्य घटनांचा साक्षीदार असण्याच्या निमित्ताने. सचिन कुंडलकर दिग्दर्शित राजवाडे अॅण्ड सन्स हा सिनेमा वर्तमानकालीन पुण्याच्य...