Posts

Showing posts with the label Latur Pattern

Behind Every Great Fortune There Is A Crime

Image
२०११ मध्ये लातूर पॅटर्न कादंबरी प्रकाशित झाली होती. कादंबरी लिहिली ती माझ्या कॉलेजातील अनुभवांवर आधारित. मी १९९८-२००३ अशी पाच वर्ष अनुक्रमे बीकॉम व बीएस्सीमध्ये नापास होतो. पुढे बीए-एमए केलं. त्यामुळे कादंबरी त्या नापास व नंतर बीए-एमएच्या दिवसांवर आधारित आहे. नापास विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून ती लिहिली आहे. २०१४ ला मी पुण्याहून लातूरला परत आलो. या गेल्या बारा वर्षात लातूर पॅटर्न चं रुपडं पूर्णपणे बदलल्याचं दिसून आलं. आमच्यावेळी खाजगी क्लासेस होते पण त्यांचा आता इतका प्रभाव नव्हता. शाळा, कॉलेजातील टक्केवारीलाच महत्त्व होतं. आरसीसीमुळे ट्युशन एरियात एक इको सिस्टीम* तयार झालेली दिसून आली.  लातूरचा शैक्षणिक अवकाश वाढीला लागलेला दिसून आलेला. राजस्थानातील कोटा नंतर लातूरचं नाव घेण्यात येऊ लागलं. आताशा गेल्या पाच, सहा वर्षात अमली पदार्थांमुळे विद्यार्थी बिघडतायत असंही दिसून येत होतं. [*या विषयी मी अविनाश चव्हाण या क्लास संचालकाच्या हत्ये नंतर लेख लिहिलेला त्याची लिंक खालती पोस्टच्या शेवटी.] पैश्यांची मुबलकता जिथे असते तिथे वाममार्ग व गुन्हेगारी फोफावायला लागते. अविनाश चव्हाण ह...

हॅम्लेटचा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे?

Image
{२०१०-२०१९ या दहा वर्षांचा लेखाजोखा मांडावा म्हणून फेसबुकला पोस्ट टाकली होती. त्यामुळे त्यावेळी लिहिताना जे मनात होतं ते उतरवलं आहे. कदाचित आज माझ्यात बदल झाला असेल. पण म्हणून यात काहीही बदल केलेला नाही.} हॅम्लेटचा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे हा प्रश्न आम्हाला एमएला विचारला जायचा. कारण इतर शोकांतिकेतील नायकांचे ट्रॅजिक फ्लॉज लख्खपणे समोर दिसतात. मकबईथचा त्याच्या सत्तापिपासू वृत्तीत आहे. किंग लिअरला माणसांची पारख नाही. तर ऑथेल्लो संशयी आहे. त्यामुळे हॅम्लेटचा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे म्हटलं कि आपण त्याच्या इतकेच अंतर्मुख होतो. हा प्रश्न आठवण्याचं कारण माझा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे हा पडलेला प्रश्न. प्रश्न निर्माण झाला तो २०१० ते २०१९ दशक संपल्यावर. ह्या दहा वर्षात आपण काय केलं किंवा आपल्या आयुष्यात काय काय झालं याचं सिंहावलोकन करायला बसल्यावर लक्षात आलं आपल्यात व हॅम्लेटमध्ये फारसा फरक नाही. निदान विचार करण्यापुरता तरी आपल्यात व हॅम्लेटमध्ये साम्य आहे असं वाटायला लागलंय. पण त्याचं ते सुप्रसिद्ध स्वगत कितपत लागू होतंय याची मात्र शंका आहे. गेल्या दशकाचा विचार करू जाता सुरूवात २०१० पासून करावी लागेल. ...

लातूर पॅटर्न कादंबरी का दुर्लक्षिली गेली?

Image
काही दिवसांपूर्वी फेसबुकवर मित्र भारत निलखने मराठीतील दुर्लक्षित लेखक अशा अर्थाची पोस्ट टाकली होती व इमॅन्युलने मला टॅगलं होतं. त्या पोस्टमुळेच मला हे लिहावंसं वाटलं. पार्श्वभूमी २०११ मध्ये कादंबरीचं प्रकाशन झालं. यावर्षी दहा वर्ष होतील कादंबरीला. प्रकाशन झाल्यावर वाटलं होतं लवकरच सर्व थरातून तिची दखल घेतली जाईल. या विषयावर लिहिणारे पहिले आपणच म्हटल्यावर उत्साहाने वाचक त्याचं स्वागत करतील. समीक्षा होईल. पुरस्कार मिळतील. असं किमान वर्षभर तरी वाटत होतं. बऱ्याच पुरस्कारांसाठी पाठवली. राज्य ते विविध ठिकाणच्या स्थानिक पुरस्कारांना पाठवली. अगदी पुण्याच्या नगर वाचन मंदिराच्या पुरस्कारासाठी स्वतः तिथे जाऊन देऊन आलो होतो. तसेच साहित्य अकादमी युवा पुरस्कार देते ३५ वर्षांखालील लेखकांच्या पहिल्या साहित्यकृतीला. मला आता नीटसं आठवत नाही पण अक्षरमानवने किंवा की मी त्यांचा फॉर्म भरून पाठवला होता बहुदा नाही सुद्धा. त्यामुळे तो मिळेल निदान वयाच्या अटीत बसत होतो म्हणून. पण कुठून कसलाच प्रतिसाद आला नाही. कादंबरी प्रकाशित झाल्यावर पेपरात परीक्षणे/समीक्षा छापून येईल म्हणून महिनाभर प्रत्येक पेपरची रविवारची...

कॉपीचा लातूर पॅटर्न

Image
आज लोकसत्तेच्या पहिल्याच पानावर ही बातमी वाचली. यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही जाणवलं नाही. लोकसत्तेला का त्यात वेगळेपणा दिसून आला काय माहिती. कदाचित कधीकाळी लातूर पॅटर्नमुळे इथल्या विद्यार्थ्यांचं नाव महाराष्ट्रात आदरानं घेतला जात होतं म्हणून असेल कदाचित. ही मुलं खरंच हुशार असतात का (हुशारी कशावरून जोखतात त्याचं त्यांनाच माहित.) याची चौकशी या पेपरने केलेली ऐकिवात नाही. तरीही कॉपीचा लातूर पॅटर्न असं हेडिंग देऊन किती शर्मानक बात है अशा पद्धतीचं वगैरे त्यात लिहिलेलं आहे. ‘गुणवत्तेचा’ (परीक्षेत भरमसाठ मार्क्स घेणे जर गुणवत्ता असेल तर धन्यच गोष्ट आहे.) लातूर पॅटर्न निर्माण करून राज्यातून इथे स्थलांतरित व्हायला लोकांना भाग पाडलं होतं म्हणे. पण एकूणच ही बातमी वाचून बऱ्याच वर्षांपूर्वीचे काही किस्से आठवले.  वर्ष : १९९६ परीक्षा : १० वीची स्थळ : देशिकेंद्र विद्यालय, लातूर या वर्षी मी दहावीत होतो. वरील शाळेत वार्षिक परीक्षेचा नंबर आलेला. लातूर पॅटर्नचा भरभराटीचा काळ. मी ज्या वर्गात बसलो होतो त्याच वर्गात सदानंद प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, लातूरचे विद्यार्थी होते. ...