Posts

Showing posts with the label Mukta Barve

हायवे एक सेल्फी आरपार : आयुष्याचा कोलाज

Image
प्रवास सर्वचजण करतात. कधी स्वतःच्या वाहनाने, कधी खाजगी नाहीतर सरकारी बसने, कधी टॅक्सीत तर कधी ट्रकने. हा प्रवास कोणत्या आर्थिक थरातले आहात तसेच कुठे जायचे आहे यावर अवलंबून असतो. म्हणजे एखादी एनआरआय व्यक्ती ट्रकमध्ये लिफ्ट घेऊन प्रवास करणार नाही की ज्याची आर्थिक परिस्थिती खूपच कमी आहे ज्याला सरकारी किंवा खाजगी बस परवडणार नाही तो भाड्याने कार किंवा टॅक्सी नाही घेणार. तसच प्रवास आड बाजूच्या रस्त्याने न करता एखाद्या हायवेवर किंवा एक्स्प्रेस हायवेवर होणार असेल तर प्रवास करणाऱ्यासोबत असंख्य लोकं इतर गाड्यांमध्ये असतात. त्यावेळी जो व्यक्ती ज्या वाहनातून जात असेल तो आजूबाजूच्या गाड्यात कोण लोकं आहेत याचा विचार करत नाही. तो त्यांच्या आयुष्याला कुठेही छेदणार नाही किंवा ते त्याच्या आयुष्यात येऊन गोंधळ घालणार नाहीत. तरीही प्रवासा दरम्यान कधीतरी एखादा प्रवासी दुसऱ्याचा विचार करत असेल का! करतात का नाही हे सांगता नाही येत पण उमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी या पटकथाकार-दिग्दर्शक जोडीने तसा विचार केलेला आहे. हायवे सिनेमा चालू होतो मुंबईतल्या नेहमीच्या सकाळी. पडद्यावर दिसतं असंख्य पात्र वेगवे...

शॉट : नितळ प्रेम की....

Image
शॉर्ट फिल्म ही त्याच्या चौकटीत परिपूर्ण असणे गरजेचे असते, ते का? एकतर त्याला वेळेची मर्यादा असते. अशी फिल्म फार तर चाळीस मिनिटांची असावी लागते त्यापेक्षा जास्त असेल तर ती फिचर फिल्म धरली जाते. याचा फायदा असा दिग्दर्शकाला थोड्या वेळात महत्वाचं आणि नेमकं दाखवून प्रेक्षकांना गुंतवून ठेवता येतं. हीच गोष्ट दिग्दर्शकासाठी उलटा परिणाम साधणारी असते. वेळेचं आणि आशयाचं भान सुटलं तर दिग्दर्शकाला आपण काय दाखवतोय हे लक्षात न येता परिणाम अप्रभावी ठरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे या माध्यमाच्या मर्यादा आणि बलस्थानं लक्षात न घेता जर फिल्म बनवली तर आपसूकच ती दिग्दर्शकाच्या सृजनशीलतेवर मर्यादा आणू शकते. चांगल्या शॉर्ट फिल्म्स ह्या मर्यादित वेळेचा अनादर न करता उत्तम प्रकारे आशय मांडू शकतात. स्टीवन स्पीलबर्गची अॅम्ब्लीन आणि फिल व ओली या दिग्दर्शकद्वायींची द ब्लॅक होल या शॉर्ट फिल्म्स अशा प्रकारच्या फिल्म्स कशा असाव्यात याचा वस्तुपाठ ठराव्यात. दोन्हीत संवाद नाहीत पण ती मर्यादा प्रेक्षकांना विषय समजण्याच्या आड येत नाही. जर एखाद्या शॉर्ट फिल्ममध्ये संवाद असतील ते किती प्रभावी असू शकते हे शॉट ही ज्येष्...