Posts

Showing posts with the label Naseeruddin Shah

तेरा सुरूर : सुमारपट

Image
सिनेमाच्या एका प्रसंगात नायिका ताराला हॉस्पिटलमध्ये ठेवलेले असते. ती ड्रग्स बाळगण्याच्या आरोपाखाली जेलमध्ये असते पण ती तिथे हाताची नस कापून घेते. अर्थात पोलिसांच्या पहाऱ्यात. जेव्हा नायक रघू तिला सोडवण्यासाठी येतो तेव्हा ते पोलीस आत खोलीत तिच्या बेडजवळ थांबलेले असतात. रघू त्यांना बंदूक दाखवून तिला तिथनं घेऊन जातो. आता प्रश्न असा उपस्थित होतो जर पोलीस पहारा देत असतील तर ते खोलीच्या बाहेर का थांबू नयेत? रघू तिला सोडवायला येईल हे त्यांना माहित असेल तर त्यांनी थोडी अधिक काळजी घ्यायला नको! असे प्रश्न प्रेक्षकांना पडतात पण दिग्दर्शकाला पडत नाहीत कारण ते याच्याकडे पुरेश्या गांभीर्याने बघत नाहीत. वरील प्रसंग उदाहरणार्थ म्हणून सांगितला. संपूर्ण सिनेमात असेच बाळबोध घटना, प्रसंग दाखवण्यात आले आहेत. तारा वाडिया (फराह करिमी) डब्लिन, आर्यलंडच्या विमानतळावरून टॅक्सी करून निघाली आहे. वाटेत पोलीस पकडतात. तिच्या सामानात एका पुस्तकात ड्रग्स सापडतात. तिला जेलमध्ये वकील एली जार्डन (मोनिका डोग्रा) येऊन भेटते. ती तिची केस लढवणार असते. तारा रघूला (हिमेश रेशमिया) भेटायची इच्छा व्यक्त करते. इकडे भार...

चार्ली के चक्कर में : स्टायलिश थ्रिलर; पण...

Image
थ्रिलर सिनेमाचे काही ठोकताळे असतात म्हणजे त्यात रहस्य असावच असं नसतं किंवा कथानक पटकन पुढे सरकत असावं जेणेकरून प्रेक्षकांना शेवटपर्यंत काय चाललय याचा अदमास यायला हवाच असं नाही. त्याची गती धीमी असेल तरी चालेल पण प्रेक्षकांना अंधारात ठेवून काहीतरी दाखवण्यात येतंय याची दिशाभूल नसावी. दिशाभूल करायचीच असेल तर कथा-पटकथा, पात्रांना विश्वासात घेऊन ते तार्कीकतेच्या कसोटीवर जोखता यायला हवे. तसे नाही झाले तर प्रेक्षक चीटिंग केली गेलीय असं समजून सिनेमाबद्दल नकारात्मक बोलायला लागतो. हे व्हायचं नसेल तर कथा-पटकथा तगडी व निर्दोष असावी लागते. चित्रीकरण कसेही का असेना ते बटबटीत, कृत्रिम, अप्रभावी असू नये. सिनेमाग्रहाबाहेर पडताना प्रेक्षक काही एक विचार करून त्याच्या आकलनानुसार कथा समजून घ्यायचा प्रयत्न करतो. चार्ली के चक्कर में या सिनेमाबद्दल असंच काहीसं झालंय. सिनेमाची सुरुवात काही गन शॉट्सनी होते. त्यात एकजण दुसऱ्याला गोळी घालून मारतो. एक स्त्री या बद्दल पाठीमागनं बोलत असते. लगेच नंतर पोलीस स्टेशनमध्ये इन्व्हेस्टीगेटींग ऑफिसर संकेत पुजारी (नसिरुद्दीन शाह) त्याची सहकारी समीरा पटवे (औरोशिखा...