Posts

Showing posts with the label Rajan Khan

प्रणव सखदेव, कविता दातीर आणि बालाजी सूर्यवंशी.

Image
जे घडून गेलं त्याचा खेद नाही पुढयात काय वाढलंय याची चिंता नाही आत्ता आहे पृथ्वीवर आहे पृथ्वी फिरतेय स्वतः भोवती सूर्याभोवती … प्रणवने लिहिलेल्या कवितासंग्रहातील एका कवितेच्या वरील काही ओळी. सर्व कविता आजच्या काळाशी निगडीत लिहिलेल्या आहेत त्यामुळे वाचायला सोप्या. माझ्यासारख्या कवितेच्या जवळ न फिरकणाऱ्या माणसाला तर यांच्यातलं फार काही कळत नाही. तसेच मराठीत सध्या कवितेत कोणता प्रवाह आहे किंवा नवं काय आहे ते पण माहित नाही. शाळेत क्रमिक पुस्तकात असणाऱ्या मराठी कविता ज्या आता आठवत पण नाहीत पण गाईडातून त्यांचे अर्थ समजून घेऊन त्यातलीच उत्तरं पाठ करून उत्तरं सोडवण्यापुरत्या वाचलेल्या. पुढे शाळा संपल्यावर अकरावीला सायन्स घेतलं, डॉक्टर होण्यासाठी. सायन्स घेतलं म्हटल्यावर सायन्स फिक्शन वाचणे ओघाने आलेच असा प्रघात नसला तरी जयंत नारळीकर, निरंजन घाटे, लक्ष्मण लोंढे यांच्या कथा-कादंबऱ्या आणि मोहन आपटे, बाळ फोंडके यांची वैज्ञानिक पुस्तके वाचायचा छंद लागला. डॉक्टरीला जाता आलं नाही कारण तेवढा अभ्यासच नव्हता. त्यामुळे मग कॉमर्स परत यु टर्न मारून बीएस्सी करत करत दोन्ही ठिका...

लातूर पॅटर्न पहिला वर्धापन दिन

Image
आज लातूर पॅटर्नच्या प्रकाशन सोहळ्याचा पहिला वर्धापन दिन. कादंबरी प्रकाशित झाल्यावर मला बऱ्याच प्रमाणात त्याच्याकडून अपेक्षा होती की कादंबरी चर्चिली जाईल, परीक्षणं येतील, चर्चा घडेल, टीका होईल किंवा या पैकी काहीही होणार नाही. काहीही होणार नाही हे जास्त अपेक्षित होतं. असं का झालं याचा विचार करत होतो तेव्हा काही शक्यता लक्षात आल्या. १) मी जेव्हा हे लिहिलंय किंवा छापतोय असं मित्रांना सांगितलं तेव्हा त्यांची प्रतिक्रिया फारच थंड होती. असं का झालं! मला जाणवलेलं कारण म्हणजे माझे जवळपास सगळे मित्र हे मराठी किंवा इंग्रजी साहित्याचे वाचक नाहीत. यातले बरेच जण दररोजचा वर्तमानपत्रसुद्धा वाचत नाहीत. जे काही थोडेफार वाचक आहेत त्यांच्यापर्यंत कादंबरी पोचली नाही. २) माझ्या घरात कथा, कादंबरी, कविता किंवा एकूणच साहित्याविषयी कसलंही सोयरसुतक नाही. त्यामुळे घरातूनसुद्धा मला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. घरी मी एकटाच असा आहे ज्याला यात प्रचंड आवड आहे. ३) ज्या-ज्या लोकांनी कादंबरी वाचली ते सर्वजण पदवीधर आहेत ही बाब विचार केल्या नंतर लक्षात आली. त्यामुळे तिला दुर्लक्षित कर...