Posts

Showing posts with the label Ratna Pathak

नील बटे सन्नाटा : स्वप्नाळू आईची भिडणारी गोष्ट

Image
ताजमहालच्या पार्श्वभूमीवर चंदा आणि अपु बोलत बसलेल्या. चंदा तिला स्वप्न का बघायची? ती साकार करण्यासाठी किती व कशा पद्धतीने मेहनत घ्यायची? कुणी आपल्या स्वप्नांच्या आड येत असेल तर त्यांच्याशी कसं वागायचं? वगैरे बाबींबद्दल बोलत असते. हे सांगणं सिनेमात ज्या टप्प्यावर येतं तो पर्यंत बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात. दहावीत असणारी अपु दहावी नंतर काय या प्रश्नावर एक सोपं उत्तर सांगून तिचे तोंड बंद करत असते. चंदासाठी हे आव्हान असतं तिला या उत्तरापासून परावृत्त करायचं. ते ती कसं करते याची कथा म्हणजे ‘नील बटे सन्नाटा’ हा सिनेमा. चंदा शिवलाल सहाय (स्वरा भास्कर) ही अपेक्षा सहायची (रिया शुक्ला) आई. आग्रा शहरातल्या एका गरीब वस्तीत दोघी राहत आहेत. चंदा कामवाली बाई म्हणून डॉक्टर दिवाणबाईंच्या (रत्ना पाठक शाह) घरी काम करत असते. तसेच उरलेल्या वेळात एका शूज बनवायच्या कंपनीत नोकरी करत असते.  अपेक्षा अभ्यासात लक्ष देत नसते त्यामुळे दरवर्षी काठावर पास होऊन वर्षागणिक जाडजूड होणारी पुस्तके वाचणेच आपल्या नशिबात आहे असं तिला वाटत असतं. चंदा तिला एकदा विचारते तुला दहावी नंतर काय करायचं आहे. डॉक्टर...

कपूर अँड सन्स : अ फॅमिली पोर्ट्रेट

Image
सर्वच कुटुंबात कलह असतात. काही ना काही कारणाने नेहमी वाद-प्रतिवाद चालू असतात. कलहाचं प्रमाण किती यावर ते छोटं कुटुंब, सुखी कुटुंब आहे का हे दिसून येतं. त्याला आर्थिक, सामाजिक स्तर काही एक प्रमाणात कारणीभूत असतो. सुखवस्तू कुटुंबात वरकरणी सर्व आलबेल आहे असं दिसतं कारण आर्थिक चणचण ही मुख्य अडचण नसते, अर्थात असं नेहमीच असतं असंही नाही. तरीही कुटुंबातल्या व्यक्तींचा एकमेकांशी कसा व्यवहार आहे यावरही कलह अवलंबून असतात. त्यातनं उद्भवणाऱ्या परिणामांवर मात्र कुणाचाच नियंत्रण नसतं. कपूर अँड सन्समधल्या व्यक्तींना सुद्धा याची जाणीव होते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. नव्वद वर्षांचे अमरजीत कपूर (ऋषी कपूर) हे त्यांचा मुलगा हर्ष (रजत कपूर) व सून सुनिता (रत्ना पाठक शाह) यांच्यासोबत कुन्नूरमध्ये राहत असतात. त्यांना कधी एकदा मरतो याची घाई लागलेली असते. दररोज मी कसा मरेन याचाच ते सराव करत असतात. त्यांच्या या नाटकी वागण्याला मुलगा व सून दोघेही कंटाळलेले आहेत. त्यातच सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका येतो. ताबडतोब त्यांच्या दोन्ही नातवांना राहुल (फवाद खान) व अर्जुन (सिद्धार्थ मल्होत्रा) जे अनुक्रमे लं...