Posts

Showing posts with the label Steven Spielberg

ज्युरासिक वर्ल्ड : चित्तचक्षुचमत्कारिक राईड

Image
१९९३ साली आलेल्या ज्युरासिक पार्क हा स्टीवन स्पीलबर्गच्या कारकिर्दीतला एक महत्वाचा चित्रपट. त्याचा प्रभाव जागतिक सिनेमावर जसा पडला तसा सर्वसामान्य प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगाची सफर त्याने घडवून आणली. डायनोसॉर हे महाकाय प्राणी कधी काळी पृथ्वीवर वावरत होते आणि त्यांचे वंशज म्हणजे आजचे जमिनीवरील आणि पाण्यातील प्राणी इतकी माहिती शाळेतल्या पुस्तकातून सर्वांना होतीच. तरी पण ते दिसतात कसे, ओरडतात कसे, त्यांचं वागणं कसं असेल वगैरे गोष्टींचा अनुभव शालेय पुस्तके देऊ शकत नव्हती. स्पीलबर्गच्या ज्युरासिक पार्कने ते काम केलं. हे प्राणी असतात कसे याची देही याची डोळा सर्वांना प्रचिती आणून दिली. त्यामुळे त्यांच्याबद्दल असणारं गूढ कमी झालं. अर्थात सिनेमाला असणारा भक्कम कथा-पटकथेचा, शास्त्रीय माहितीचा आधार, स्पीलबर्गची विषय हाताळण्यातली हातोटी यामुळे सिनेमा वारेमाप प्रसिद्ध झाला. पुढे यथावकाश त्याने दुसरा आणि तिसरा भाग काढला. आता नुकताच चौथा भाग प्रदर्शित झाला आहे. सायमन मसवाणी (इरफान खान) हा एका कॉर्पोरेट कंपनीचा मालक ज्युरासिक पार्क जे की आता ज्युरासिक वर्ल्ड आहे ही थीम पार्क चालवत असतो...

ज्युरासिक पार्क ३ डी

Image
शिवाजी महाराजांच्या काळात भारतात पहिल्यांदा गोव्यात पोर्तुगीजांनी प्रिंटींग प्रेस आणली. महाराजांना हे माहीत होतं का नाही माहीत नाही पण त्यांनी नक्कीच स्वतःच स्वतःचं चरित्र लिहून त्यांच्या जन्माविषयीचा घोळ मिटवला असता.  तंत्रज्ञान हे भूतकाळ जागं करायला नेहमीच कामाला येतं. इतकं जुनं उदाहरण द्यायचं कारण म्हणजे काल ज्युरासिक पार्क परत एकदा थिएटरमधे बघितला पण थ्रीडीमध्ये वीस वर्षांनतर. आल्फ्रेड हिचकॉकच्या काळातच हे तंत्र निर्माण करण्यात आलं होतं. पण त्याने नाही वापरलं. मला मात्र या चित्रपटाने भूतकाळाची सैर घडवून आणली. त्या वेळी मी आठवीत होतो.  पुण्यातून ज्ञान प्रबोधिनी तर्फे छात्र प्रबोधन नावाचं मासिक चालवण्यात येतं. आमच्या शाळेतल्या वैद्य बाई त्याचं लातूरातलं काम बघायच्या. या मासिका तर्फे दरवर्षी व्यक्तिमत्व विकसन शिबीर भरवण्यात येतं. यात पहिल्या प्रथम इच्छुक मुलांना पुण्यात शिबीर कसं घ्यायचं याचं प्रशिक्षण देण्यात येतं. मग त्या मुलांनी स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शिबीर घ्यायचं. मला धुळ्याला पाठवण्यात आलं. पुण्यात प्रशिक्षणासाठी आलो तेव्हा पेठेतून फिरताना ज्य...