Posts

Showing posts with the label The Matrix

मेट्रिक्सची पंचवीशी

Image
  १९९८-९९ हे माझ्या बीकॉम फर्स्ट ईयरचं वर्ष. कॉलेज राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर. १२ सायन्समध्ये ५०% घेतल्यामुळे पुढे बीएस्सी करण्याची इच्छा नव्हती. मग घरचे म्हणाले बीकॉम करून सीए हो. (लो ऐम इज क्राईम) तर शाहू कॉलेजात अॅडमिशन घेतलं. सोबतच काहीतरी टेक्निकल शिकायला हवं म्हणून एनआयआयटीचा कोर्स करायला सांगितलं. तिथे घेतलं अॅडमिशन. तेव्हा लातुरात नुकताच एनआयआयटी चालू झालेलं. कम्प्युटरबद्दल आकर्षण केशवराज शाळेत असतानाच निर्माण झालेलं. शाळेत असणाऱ्या मोनोक्रोम मॉनिटरवर ‘प्रिन्स ऑफ पर्शिया’ बघितलेला. एनआयआयटीत एमएस डॉस व विंडोज शिकायला मिळाले. त्यामुळे कम्प्युटरचं जग काय भानगड असते ती कळायला लागली होती. त्याच्या पुढच्या अॅडव्हांस कोर्सला अॅडमिशन घेतलेली. एचटीएमएल, एसक्यूएल, सी, सी++, जावा व इतर गोष्टी शिकायला सुरूवात झालेली. पण ते इन्स्टीट्युट बंद पडलं त्यामुळे कोर्स तिथेच बंद पडला. (आणि जग एका मोठ्या व श्रेष्ठ दर्जाच्या प्रोग्रॅमरला मुकलं. नाही तर ‘९९ साला नंतरचे कम्प्युटर प्रोग्रामिंगशी निगडीत सगळे शोध मीच लावले असते.) हॉलीवूड सिनेमाचं दालन उघडलं गेलं ’९३ सालच्या ज्युरासिक पार्कमुळे. क...

तिशीतील वर्ल्ड वाईड वेब

Image
आज वर्ल्ड वाईड वेबचा तिसावा वाढदिवस. ८९ साली याची सुरुवात झाली. तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. पुढे याच्याशी संपर्क आला तो ९८-९९ साली जेव्हा मी एनआयआयटीचा बेसिक कॉम्प्युटर कोर्स केला तेव्हा. त्यावेळी वर्ल्ड वाईड वेबला दहा वर्ष होत आले होते.   Floppy Discs माझा कॉम्प्युटरशी पहिल्यांदा संबंध आला तो केशवराज शाळेत असताना. तेव्हा शाळेने एक कॉम्प्युटर विकत घेतला होता. तिसऱ्या मजल्यावर एका खोलीत ठेवला होता. तो थंड राहावं म्हणून त्याला पडदानशीन केलं होतं. एका टेबलावर तो ठेवलेला असायचा. टीव्हीसारखा दिसणारा मोनोक्रोम मॉनिटर , त्याच्या खाली सीपीयू असायचा. सीपीयूमध्ये फ्लॉपी डिस्कस घालतात असं त्याला ऑपरेट करणाऱ्या माणसाने सांगितलं. संगणक साक्षरता वगैरे गोष्टींचं फॅड अजून सुरू व्हायचं होतं. मला मॉनिटरचं आकर्षण निर्माण झालं होतं. कारण त्यावरील प्रतिमा हलायच्या टीव्हीवरच्या प्रतिमांसारख्या सेम टू सेम.  Prince of Persia आम्हाला संगणक नावाचा एक एक्स्ट्रा विषय दिलेला होता. एके दिवशी आम्हाला त्यांनी ‘प्रिन्स ऑफ पर्शिया’ गेम खेळून दाखवला. मोनोक्रोम दिसणाऱ्या त्याच्या हलत्या आक...