Posts

Showing posts from May, 2015

पीजी - अ पेईंग घोस्ट : न पटणारी भूतं

Image
दिवंगत  ज्येष्ठ  लेखक व. पु. काळे हे मराठीतले वाचकप्रिय लेखक. वाचनाच्या टप्प्यामध्ये एक महत्वाचा पडाव असणारं नाव. त्यांनी शेकडो कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या आणि स्वतःच्या कथांचे कथाकथनाचे कार्यक्रम केले. त्यांच्या असंख्य कथांमध्ये एक असणारी बदली ही कथा. ज्यांनी त्यांचे कथाकथनाचे कार्यक्रम ऐकले किंवा बघितले असतील त्यात ते नेहमी बदली या कथेचं वाचन करायचे हे लक्षात येईल. याच बदली या कथेवर आधारित प्रस्तुत सिनेमा आहे. माधव माटेगावकर (उमेश कामत) मुंबईतल्या कोणत्याश्या खाजगी कंपनीत कामाला म्हणजेच चाकरमाना. तो ज्या चाळीत राहतो तिथे त्याच्या खोलीत पाणी येत नाही कारण बाजूच्या खोलीत राहणाऱ्या गणपुलेंमुळे (समीर चौघुले) त्याच्या नळाला पाणी येत नाही. त्यांना ते विचारण्याचं धाडस याच्याकडे नाही. तो कुणालाच नाही म्हणू शकत नाही. त्याच्या ऑफिसात असणाऱ्या माधवी मिरजकरवर (स्पृहा जोशी) त्याचं प्रेम आहे पण ते सुद्धा तिला स्पष्टपणे सांगणं त्याला जमत नसते. एकूणच त्याच्या आयुष्यात तडजोडी करत जगणे हेच लिहिलेले असते. अशातच कुठून तरी गजानन एकबोटे (पुष्कर श्रोत्री) नावाचं भूत अवतरतं. त्या...

बॉम्बे व्हेल्वेट : अनुरागचा बिग शॉट

Image
१९९८ च्या सत्यामध्ये श्रेयनामावलीमध्ये सौरभ शुक्लासोबत अजून एक नाव होतं ते म्हणजे अनुराग कश्यप. सत्या त्या वेळी वेगळा ठरला ते त्याच्याकडे एक वास्तववादी कथानक मांडायचं या राम गोपाल वर्माच्या दृष्टिकोनामुळे आणि पटकथाकार कश्यप-शुक्लाच्या दिग्दर्शकाच्या दृष्टीकोनाला पूरक पटकथेमुळे. पटकथाकार अनुराग पुढे यथावकाश दिग्दर्शक झाला. त्याच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीचा आढावा घेतला तर त्याच्या पहिल्या सिनेमापासून ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमापर्यंत काही गोष्टी दिसून येतात. हिंदी सिनेमा, गुन्हेगारी आणि मुंबई शहर. गँग्ज ऑफ वासेपूरमध्ये कथानक जरी मुंबईपासून दूर असलं तरी त्यातील मुख्य पात्र शेवटी वासेपूर सोडून मुंबईत येतात. त्यात सुद्धा हिंदी सिनेमाचे संदर्भ आणि गुन्हेगारी तर मुख्य विषय होता. त्यामुळे वरील तिन्ही गोष्टी तो परत परत वापरताना दिसतो. अर्थात या व्यतिरिक्त त्याने गुलाल, देव डी, अप्रदर्शित पांच असे सिनेमे केले आहेत. इतकं विवेचन द्यायचं कारण सत्यामध्ये सुद्धा याच गोष्टी खूप ठळकपणे आल्या होत्या ज्याचा प्रभाव आजही त्याच्यावर आहे. आजच्या घडीला तरी त्याचे सिनेमे इतरांपेक्षा वेगळे ठरतात. ...

पिकु : सहजसुंदर ‘बद्धकोष्टता’

Image
इटालियन नव-वास्तववादी सिनेमाची सुरुवात झाली तेव्हा त्यातल्या आशयाबद्दल बरीच उलटसुलट चर्चा झाली. चर्चा करणाऱ्यांचा मुख्य रोख त्यात मांडलेल्या आशयाबद्दल होता. नव-वास्तववादी शिलेदारांचं म्हणणं होतं की सिनेमाची कथा ही नेहमी भव्य दिव्य असावीच असं नाही तर आपल्या दररोजच्या आयुष्याकडे निरखून बघितलं तर खूप कथा बघायला मिळतील. त्या वेळची आर्थिक-सामाजिक पार्श्वभूमी अश्या प्रकारचा सिनेमा पुढे येण्यासाठी कारणीभूत ठरली. शुजित सरकार (विकी डोनर, मद्रास कॅफे) या दिग्दर्शकाचा पिकू हा सिनेमा इटालियन नव-वास्तववादी सिनेमाशी पूर्णतः साधर्म्य दाखवत नसला तरी तो त्यातल्या आपल्या आयुष्यातल्या दररोजच्या घटनांकडे पुरेश्या खोलात पाहिलं तर त्यात एखादं छानसं नाट्य मिळेल या विचाराशी मिळतंजुळतं कथानक मांडतो. भास्कोर बॅनर्जी (अमिताभ बच्चन) हा सत्तरीला पोचलेला निवृत्त गृहस्थ आपल्या पिकू (दीपिका पदुकोण) नावाच्या मुलीबरोबर राहत असतो. भास्कोर जरी निवृत्त असला तरी त्याचे मुख्य दोन दुखणे आहेत. पहिलं : पिकुने लग्न करण्याआधी खूप विचार करून हा निर्णय घ्यावा. दुसरं : त्याला बद्धकोष्टतेचा त्रास आहे. ज्यामुळे स...

टाईमपास 2 : गणित मांडून दुसऱ्यांदा केलेला 'टाईमपास'

Image
नया है वह, चल हवा आने दे सारखे संवाद, ही पोरगी साजूक तुपातली  सारखं सर्वत्र वाजवलं जाणारं गाणं असणारा दीड वर्षांपूर्वी आलेला टाईमपास सिनेमा निर्माता-दिग्दर्शकांच्या अपेक्षेपेक्षा खूपच प्रेक्षक प्रतिसाद मिळवून गेला. वरील संवाद तर येता जाता वापरात यायला लागले. शाकाल उर्फ माधव लेले उर्फ वैभव मांगले यांच्या फोटोशिवाय मराठीतल्या इंटरनेट मेमेजची कल्पना होईनाशी झाली इतकी त्याची व त्याच्या संवादाची प्रसिद्धी झाली. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते निळू फुलेंच्या संवादांनंतर अशा प्रकारे एखाद्या नटाच्या संवादाला सर्व थरातून दाद मिळाल्याचं बघण्यात नाही. मराठीत असं सिनेमातले संवाद दररोजच्या आयुष्यात वापरलेले कधी ऐकण्यात नव्हते. जरी सिनेमाला प्रसिद्धी वारेमाप मिळाली असली ती विशिष्ट वयोगटातल्या प्रेक्षकाकडनं. सिनेमात मूळ संकल्पनेपासून सादरीकरणापर्यंत उघड दोष होते. अभिनय बेतास बात होता; वैभव मांगलेंचा अपवाद सोडल्यास. पटकथा सदोष होती. सुचलेली कल्पना पुनर्लेखन करुन निर्दोष करावी असा विचार न करता घाई गडबडीत चित्रीकरण उरकून सिनेमा प्रदर्शित केलाय असं वाटत होतं. आता दगडू शांताराम परब (प्रियदर्शन ज...