Posts

Showing posts from December, 2015

स्टार वॉर्स द फोर्स अवेकन्स : संगमावर

Image
“‘स्टार वॉर्स’ ही या शतकाची प्रातिनिधिक मालिका आहे. ती कोणत्याही एका कथासूत्राकडे फार गंभीरपणे किंवा खोलात जाऊन बघत नाही. पण समाजातल्या चांगल्या-वाईट प्रवृत्ती, विचार, कल्पना, घटना यांचं एक प्रतिबिंब ती आपल्यासमोर उभं करते. तिने निवडलेला पेहराव बालचित्रपटाचा असला, तरी तो केवळ पेहेराव आहे, हे ध्यानात ठेवलं, तर या कहाणीपासून बरंच काही आपण मिळवू शकतो. निदान मानव, देव-दानव, निसर्ग, प्रगती यांच्याशी निगडीत मुलभूत प्रश्नांची मुलभूत उत्तरं तरी.” -- गणेश मतकरी ल्युकसची पहिली चित्रत्रयी फिल्ममेकर्स जॉर्ज ल्युकसची पहिली व दुसरी चित्रत्रयी ज्यांनी पाहिली असेल त्यांना वरील परिच्छेदावरून स्टार वॉर्सबद्दल जास्त सांगायची गरज नाही. ज्यांनी मालिकेतला एखादा सिनेमा बघितला असेल त्यांना त्यावरनं संपूर्ण मालिकेची कल्पना येणार नाही. पटकथाकार-दिग्दर्शकाचा दृष्टीकोन कळणार नाही. कदाचित प्रेक्षकांना फँटसी वाटत असली तरी तिला आपण वाचलेल्या, अनुभवलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टींचा आधार असल्याकारणाने ते पटू शकेल. पण जे आपल्या आकलनाच्या पलीकडे आहे ते कसे पचवावे असा प्रश्न पडेल. त्यामुळे अशा प्रेक्षकांना ही म...

बाजीराव मस्तानी : भन्साळीची चित्रत्रयी

Image
चित्रत्रयी म्हटलं की बऱ्याच चित्रत्रयींचा आठवण होते. सत्यजित रेंची अपू चित्रत्रयी. रिचर्ड लिंकलेटरची बिफोर चित्रत्रयी. गेल्या काही वर्षात सुपरहिरोजंना केंद्रस्थानी ठेवून बनवलेल्या बॅटमॅन आणि स्पायडरमॅन चित्रत्रयी अनुक्रमे क्रिस्टफर नोलन आणि सॅम रैमीनी दिग्दर्शित केलेल्या. या सर्व चित्रत्रयींमध्ये एक विषय केंद्रस्थानी होता. अपूमध्ये अपुच्या आयुष्याचा पट होता तर बिफोरमध्ये एका जोडप्याचा संवाद त्यांच्या जगण्यातल्या अवकाशाला कवेत घेऊन एक प्रातिनिधिक स्वरुपात मांडून आजच्या काळाचं चित्र उभे करणे असा होता. बॅटमॅन आणि स्पायडरमॅन मुळात सुपरहिरोज असले तरी चित्रत्रयीद्वारे त्यांना वास्तववादी बनवण्याचा प्रयत्न होता खासकरून बॅटमॅनमध्ये. त्यामुळे बरेच दिग्दर्शक चित्रत्रयी बनवण्याचं धाडस करत असावेत. हिंदी सिनेमात चित्रत्रयी हा प्रकार म्हणावा तितका रुळलेला नाही. बासू भट्टाचार्यनी अनुभव, आविष्कार आणि गृह प्रवेश ही लग्न आणि कुटुंब संस्थेला थीम बनवलेले सिनेमे चित्रत्रयीच मानले जातात. कथानकात एकमेकांपासून वेगळे असले तरी. सिक्वेल असणारे सिनेमे असले तरी चित्रत्रयी बनवावं असं हिंदीतील दिग्दर्शकांना वाटत ...

‘अनरउबिक’ इंटरनेटचा ऑक्सिजन – वैशाली चिटणीस

Image
{ कादंबरी नव्या शतकाची... (शब्द रुची डिसेंबर २०१५ अतिथी संपादक डॉ. वीणा सानेकर)  २००० ते २०१५ सालातल्या कादंबऱ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपात विचार केला आहे. गेल्या पंधरा वर्षात मराठी कादंबरी कुठे आहे याचं चित्र उभं राहण्यासाठी या अंकाची योजना केली आहे. इतर जेष्ठ लेखकांबरोबर याची निवड करण्यात आली आहे.} बदलांचे टप्पे नोंदवताना आपल्याकडे १९९१ या वर्षाची दखल घेणं अपरिहार्य आहे. या वर्षी झालेल्या आर्थिक सुधारणांनी पुढच्या काळाची चाकं वेगाने फिरली. त्या सगळ्याचा परिणाम भारतीयांच्या रोजच्या जगण्यावर झाला. हळूहळू जगणं बदलत गेलं. साध्या लॅ ण्ड लाईन फोनसाठी, स्कूटरसाठी नंबर लावावा लागणाऱ्याच्या हातात स्मार्टफोन खेळायला लागेल, देखण्या गाड्यांनी रस्ते व्यापले. चकचकीत मॉल हे मध्यमवर्गीयांचं जगण्याचं वास्तव झालं. टीव्ही वाहिन्यांनी त्यांचा जगातल्या चांगल्यावाईट सगळ्याच गोष्टींशी परिचय करून दिला. एकुणात जगणं बदललं, फक्त तेवढंच नाही तर त्याबरोबर राजकीय, सामाजिक जीवन, जगण्याच्या, नैतिकतेच्या कल्पना बदलत गेल्या. ही सगळी प्रक्रिया कवेत घेऊ पाहणारी कादंबरी म्हणून ‘अनरउबिक’ या कादंबरीकडे प...

तमाशा : व्हाय आल्वेज द सेम स्टोरी!

Image
श्रीमंत नायक-नायिका असूनही त्यांचे सामान्य माणसांसारखे जमिनीवर वावरणे, हिंदी प्रेमपटांचे टिपिकल संवाद आणि दृश्ये यांची व्यक्तीरेखांकडून जमेल तितकी, जमेल तशी खिल्ली उडवणे. बहुतांश चित्रपटाच्या केंद्रभागी असणाऱ्या मुंबईऐवजी आपल्या दिल्ली शहराला कथानकामध्ये प्राधान्य देणे. आणि प्रमुख व्यक्तिरेखांचा प्रेमाबाबत प्रचंड गोंधळ असणे, या गोंधळामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांमधून व्यक्तिरेखांच्या वैयक्तिक आयुष्यात अमूलाग्र बदल घडवून आणणे, त्यानंतर मग पारंपारिक बॉलीवूडी मसाल्याचाच शेवटला आधार घेत चित्रपट तारून नेणे, हे त्याच्या चित्रपटांमधील ठराविक आलेख आहेत. --इम्तियाज अली, तरुणाईचे चित्रपट आणि लव्ह आज कल पंकज भोसले, लोकप्रभा २१ ऑगस्ट २००९ पंकज भोसलेंनी केलेलं इम्तियाजचं विश्लेषण किती योग्य आहे हे त्याचे सर्व सिनेमे बघून जाणवतं. थोडा फरक असेल तर तो हायवे या मागच्या वर्षी आलेल्या सिनेमात. स्टॉकहोम सिंड्रोमचा बळी ठरलेल्या नायिकेची कथा असं त्याचं स्वरूप होतं. निश्चित कळसाध्याय नसल्यामुळे शेवट प्रभावी नव्हता. तसेच सोचा न था पासून असणारी ट्रेडमार्क शैली त्यात गायब होती जरी नायक-नायि...