रॉकी हँडसम : स्टायलीश नक्कल
रिमेक करताना नेमकं कुठल्या गोष्टी घ्यायचा किंवा कुठल्या गोष्टी घ्यायच्या नाहीत याचं भान निर्मात्यांना असणं नितांत गरजेचं असतं. त्याची बरीच कारणं आहेत. पहिलं कारण सामाजिक वास्तवात होणारा बदल म्हणजे एखाद्या युरोपिअन देशाच्या पार्श्वभूमीवर घडणारी कथा तिथल्या सांस्कृतिक, सामाजिक वास्तवाला आधार घेऊन बनवलेली असते. कथानकात घडणारे प्रसंग काही एक प्रमाणात तिथल्या वास्तवाचं चित्रपटीय रुपांतर असू शकतील भलेही सिनेमा एखादा क्राइम थ्रिलर असला तरी. जेव्हा तेच कथानक भारतासारख्या सर्वार्थाने वेगळ्या सामाजिक-सांस्कृतिक पार्श्वभूमीवर दाखवायचा असेल तर त्याला इथल्या वास्तवाचा आधार असणं अपेक्षित आहे किंवा निदान ते विश्वसनीय वाटावं. पण निशिकांत कामत दिग्दर्शित “रॉकी हँडसम” या “द मॅन फ्रॉम नोव्हेअर” या कोरिअन सिनेमाच्या रिमेकबद्दल ठोसपणे सांगता येत नाही. कबीर अहलावत/रॉकी हँडसम (जॉन एब्राहम) हा गोव्यात एक पॉनशॉप चालवत असतो. तो एकटाच राहत असतो. त्याच्या दुकान कम घरासमोर एक स्त्री अॅना (नतालिया कौर) व तिची मुलगी नायोमी (दिया चलवाड) राहत असतात. नायोमी त्याला हँडसम म्हणत असते. त्याचा एकटेपणा तिच्यामुळे...