Posts

Showing posts from April, 2016

नील बटे सन्नाटा : स्वप्नाळू आईची भिडणारी गोष्ट

Image
ताजमहालच्या पार्श्वभूमीवर चंदा आणि अपु बोलत बसलेल्या. चंदा तिला स्वप्न का बघायची? ती साकार करण्यासाठी किती व कशा पद्धतीने मेहनत घ्यायची? कुणी आपल्या स्वप्नांच्या आड येत असेल तर त्यांच्याशी कसं वागायचं? वगैरे बाबींबद्दल बोलत असते. हे सांगणं सिनेमात ज्या टप्प्यावर येतं तो पर्यंत बऱ्याच गोष्टी घडलेल्या असतात. दहावीत असणारी अपु दहावी नंतर काय या प्रश्नावर एक सोपं उत्तर सांगून तिचे तोंड बंद करत असते. चंदासाठी हे आव्हान असतं तिला या उत्तरापासून परावृत्त करायचं. ते ती कसं करते याची कथा म्हणजे ‘नील बटे सन्नाटा’ हा सिनेमा. चंदा शिवलाल सहाय (स्वरा भास्कर) ही अपेक्षा सहायची (रिया शुक्ला) आई. आग्रा शहरातल्या एका गरीब वस्तीत दोघी राहत आहेत. चंदा कामवाली बाई म्हणून डॉक्टर दिवाणबाईंच्या (रत्ना पाठक शाह) घरी काम करत असते. तसेच उरलेल्या वेळात एका शूज बनवायच्या कंपनीत नोकरी करत असते.  अपेक्षा अभ्यासात लक्ष देत नसते त्यामुळे दरवर्षी काठावर पास होऊन वर्षागणिक जाडजूड होणारी पुस्तके वाचणेच आपल्या नशिबात आहे असं तिला वाटत असतं. चंदा तिला एकदा विचारते तुला दहावी नंतर काय करायचं आहे. डॉक्टर...

फॅन : शाहरूखीय जुगलबंदी

Image
‘होली स्मोक’ सिनेमातील एक तरुण स्त्री पात्र टॉम क्रुझची प्रचंड चाहती असते. नवऱ्याशी संग करत असताना सुद्धा तिला टॉम क्रुझच आपल्याशी संग करतोय असं वाटत असतं. सर्वसामान्य ऑस्ट्रेलिअन कुटुंबातील असून पण दूरदेशी असणाऱ्या एका स्टार अभिनेत्याप्रती असणारं प्रचंड आकर्षण तिच्यासाठी इतर गोष्टींपेक्षा जास्त महत्वाचं असतं. स्टार अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्याबद्दल असणारं आकर्षण, त्यांच्या पडद्यावरील प्रतिमा ह्या खऱ्या मानण्याचा व तो/ती आपल्यातच वसलेली आहेत याची असणारी प्रचंड जाण ही त्यांना भेटण्याच्या, त्यांचे वाढदिवस साजरे करण्याच्या पलीकडे जाणारी असते. खरं आयुष्य व पडद्यावरील प्रतिमा यात महदंतर असते याची जाणीव सर्वांनाच असते असे नाही जसे की वरील उदाहरणात सांगितले तसेच ते गौरव चान्दनाच्या बाबतीत सुद्धा लागू होते. दिल्लीच्या इंदरविहारमध्ये राहणारा गौरव चान्दना (शाहरुख खान) हा एके सायबर कॅफे चालवणारा तरुण आर्यन खन्ना (शाहरुख खान) या बॉलीवूड सुपरस्टारचा प्रचंड चाहता असतो. अगदी लहानपणीपासून त्याने त्याचे सर्व सिनेमे बघितलेले असतात. त्याचे फोटोज व इतर गोष्टी गोळा केलेल्या असतात. जळी-स्थळ...

लव्ह गेम्स : मिळमिळीत थ्रिलर

Image
विक्रम भटचा सर्वात चांगला सिनेमा गुलाम. (सर्वश्रेष्ठ म्हणणं अवघड आहे.) ऑन द वॉटरफ्रंटचा प्रभाव असला तरी मुंबईतल्या एका वस्तीत घडणारी कथा सर्वच पातळीवर जमून आलेली असल्यामुळे आजही बघणीय आहे. खासकरून आमीर खानच्या कारकिर्दीतील एक उत्तम भूमिका असलेला हा सिनेमा भारतीय पार्श्वभूमीत चपखल बसणारा होता. त्या आधीचे व नंतरचे सिनेमे मात्र म्हणावे तितके प्रभावी नव्हते व राज किंवा १९२० चं बॉक्स ऑफिस सक्सेस इतरही बऱ्याच गोष्टींवर अवलंबून होतं. भटच्या सिनेमात स्वतंत्र कथा-पटकथा अशा नसतात कुठल्या ना कुठल्या हॉलीवूड सिनेमाच्या कथेचा प्रभाव असतोच. त्यामुळे सिनेमा बघताना या आधी आपण हे कुठेतरी बघितलं आहे याची टोचणी लागून राहते. लव्ह गेम्स ही याला अपवाद राहत नाही. रमोना रायचंद (पत्रलेखा) या मुंबईतल्या एका पेंटहाउसमध्ये राहणाऱ्या आणि पेज थ्री पार्टीज एन्जॉय करत आयुष्य घालवणाऱ्या तरुणीचा तीनच गोष्टींवर विश्वास असतो. जिंकणे, कोकेन आणि लव्ह गेम्स. तिचा मित्र सॅम उर्फ समीर सक्सेना (गौरव अरोरा) जो तिच्यासाठी फक बडी असतो याच्यासोबत ती एक अॅडव्हेंचर तडीस न्यायचा प्लॅन करते. लव्ह गेम्स नावाच्या एका पुस्तका...

की अँड का : उथळ श्रमविभागणी

Image
भारतीय स्त्री-पुरुषांच्या भूमिका जन्मतः ठरलेल्या असतात. स्त्री असेल तर चूल-मुल व रांधा-वाढा-उष्टी काढा तर पुरुष असेल तर घरचा कर्ताकरविता, पैसे कमावणारा, सुरक्षितता देणारा. या भूमिका वर्षानुवर्षे कुठलीही चिकित्सा न करता बिनबोभाटपणे दोन्ही बाजूकडून पार पाडल्या जात आहेत. कधी काळी कुठल्या तरी समाजपुरुषाने केलेली ही श्रमविभागणी आजही तितकीच सक्षमपणे चालू आहे. मेट्रोसेक्स्युअल पुरूषांबाबत मात्र हे म्हणता येणार नाही निदान ते स्त्रियांच्या कामात मदत करतात किंवा तसा बदल त्यांच्यात दिसतो. श्रमविभागणीत पूर्णतः अदलाबदली झालीय असं झालेलं नाही. तरीही समजा एखाद्या पुरुषाने स्वतःहून एखाद्या स्त्रीसारखं गृहिणीपद घेतलं तर काय होईल हे आर. बाल्की की अँड का मध्ये मांडायचा प्रयत्न करतात. कबीर बन्सल (अर्जुन कपूर) विमानात रडत बसलाय. त्याच्या बाजूला किया (करिना कपूर खान) बसलीय. तिला आश्चर्य वाटतं एक पुरुष असून तो का रडतोय. कारण त्याच्या आईला जाऊन आता दहा वर्ष होत आलीयत. त्याला तिची आठवण येत असते. व्हिस्की पिण्याच्या बहाण्याने त्यांच्यात मैत्री होते. त्याला मात्र आपल्या आईसारखं ‘ आर्टिस्ट’ व्हायचं अस...