Posts

Showing posts from 2021

सायोनारा

Image
  चित्रपट समीक्षक होणे माझा कधीच उद्देश नव्हता. पुण्यात शिकायला गेलो ते वेगळीच स्वप्ने डोक्यात घेऊन. जे ठरवलं होतं ते काही जमलं नाही. स्वप्ने काही पूर्ण करता आली नाहीत. नोकरीसारख्या नसत्या फंद्यात पडलो. तिथं पण फार चमक दाखवू शकलो नाही. लहानपणापासून सिनेमे बघणे कोणत्याही भाषेतले असो हिंदी, मराठी, कन्नड, इंग्लिश, किंवा हिंदी डब केलेले एवढाच उद्देश होता. वाचायला यायला लागल्यापासून पेपर वाचणे हा नित्यक्रम असायचा त्यातही चित्रपट समीक्षा वाचायला आवडायचं. चित्रपटावर घरात चर्चा ऐकायचो. त्या चर्चा कुठल्या तरी पेपरातील चित्रपट समीक्षेवर वा दिवाळी अंकातील लेखांवर आधारित असायची. त्यातनं किस्से वजा गॉसिपचं जास्त असायचं. मला आठवतंय माझा एक आतेभाऊ  रेंचा गणशत्रू की आगंतूक  बघून आला होता तेव्हा त्यावर बरंच बोलत होता. कोणत्या तरी फिल्म क्लब की सोसायटीत त्याने बघितला होता. रे हा मोठा दिग्दर्शक आहे एवढं त्याच्या बोलण्यावरून कळलं होतं. घरात चर्चा असायच्या त्या हिंदी, मराठी गाण्यांची व संगीताची कारण त्यावेळी आम्ही व आत्याचं कुटुंब एकत्र राहत असू. त्यामुळे सगळे मिळून टीव्हीवर सिरीअल्स, सिनेमे...

चिंटू का बर्थडे आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्स

Image
विसाव्या शतकाची असंख्य वैशिष्ट्ये आहेत. पैकी एक म्हणजे जगभरात स्थलांतरितांचा झालेला प्रवास. एका देशातून दुसऱ्या देशात जाणाऱ्यांची संख्या विसाव्या शतकात मोठ्या प्रमाणात झाल्याची दिसून येते. खासकरून पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपातून अमेरिकेत व त्यानंतर जगाच्या इतर भागातून युरोप अमेरिकेत स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली दिसून येते. स्थलांतरित होण्याची कारणे बरीच आहेत. पैकी आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक ही मुख्य कारणे. आर्थिक कारण हे त्यातल्या त्यात ठळकपणे स्थलांतरित होण्यासाठी मजबूर करणारं. स्थलांतरित जरी वैध मार्गाने होणारं असलं तरी अवैध मार्गाने होणाऱ्यांची संख्या सुद्धा तितकीच आहे. किंवा असे म्हणता येईल वैध मार्गाने जाणाऱ्यांपेक्षा अवैध मार्गाने जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. लालफितीच्या कारभारामुळे वैध ऐवजी अवैध मार्ग स्वीकारणारे बरेच दिसतात. त्यामुळे आजच्या काळात स्थलांतरितांचं जगणं ही एकाचवेळी त्या त्या भूभागासाठी पर्वणी आहे तर समस्या सुद्धा. पर्वणी या अर्थाने की शिकून नोकरी, व्यवसायासाठी जाणारा वर्ग हा तिथल्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसाठी आयुष्य...

लोकी : थॅनॉसपेक्षाही मोठ्या खलनायकाची नांदी

Image
२००८ मध्ये मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्समधील पहिला ‘आयर्न मॅन’ सिनेमा रिलीज झाला. मार्व्हलच्या इंटरगॅलॅक्टिक पसाऱ्याला सुरूवात झाली. पृथ्वीसहीत सुदूर प्रांतातील मंडळी एका कॉमन उद्देशासाठी झगडतात. पण जोपर्यंत या मंडळींना आपला मुख्य शत्रू कोण आहे हे लक्षात येत नाही तोपर्यंत ते छोट्या छोट्या संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करत असतात. थॅनॉसचं अस्तित्व समोर यायला लागतं तसं एकेक करून सर्व सुपरहिरोज एकत्र येतात आणि त्याचा खात्मा करतात. मात्र यासाठी मार्व्हल स्टुडिओजनी अकरा वर्ष घेतली. या सर्व सुपरहिरोजच्या कथा, पार्श्वभूमी, टाइमलाईन, अस्तित्वाचा उद्देश अशा बऱ्याच गोष्टींनी भरलेल्या होत्या. त्यामुळे मार्व्हलच्या पसाऱ्याची आंतरबाह्य ओळख प्रेक्षकांना झाली. पण या सर्व फिल्म्स व सिरीज हे मार्व्हलच्या फेज एक ते तीनमध्ये घडणारे होते. प्रश्न असा होता अॅव्हेन्जर्स एंडगेम नंतर मार्व्हलच्या पसाऱ्यात पुढे काय वाढून ठेवलंय. त्याचं उत्तर ‘द फाल्कन अँड द विंटर सोल्जर’, ‘वांडाव्हिजन’ आणि ‘लोकी’ सिरीजमध्ये बघायला मिळतं. अॅव्हेन्जर्स एंडगेममध्ये कॅप्टन अमेरिका, अँट मॅन आणि आयर्न मॅन भूतकाळात अव्हेन्जर्सच्या (२...

हॅम्लेटचा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे?

Image
{२०१०-२०१९ या दहा वर्षांचा लेखाजोखा मांडावा म्हणून फेसबुकला पोस्ट टाकली होती. त्यामुळे त्यावेळी लिहिताना जे मनात होतं ते उतरवलं आहे. कदाचित आज माझ्यात बदल झाला असेल. पण म्हणून यात काहीही बदल केलेला नाही.} हॅम्लेटचा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे हा प्रश्न आम्हाला एमएला विचारला जायचा. कारण इतर शोकांतिकेतील नायकांचे ट्रॅजिक फ्लॉज लख्खपणे समोर दिसतात. मकबईथचा त्याच्या सत्तापिपासू वृत्तीत आहे. किंग लिअरला माणसांची पारख नाही. तर ऑथेल्लो संशयी आहे. त्यामुळे हॅम्लेटचा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे म्हटलं कि आपण त्याच्या इतकेच अंतर्मुख होतो. हा प्रश्न आठवण्याचं कारण माझा ट्रॅजिक फ्लॉ कशात आहे हा पडलेला प्रश्न. प्रश्न निर्माण झाला तो २०१० ते २०१९ दशक संपल्यावर. ह्या दहा वर्षात आपण काय केलं किंवा आपल्या आयुष्यात काय काय झालं याचं सिंहावलोकन करायला बसल्यावर लक्षात आलं आपल्यात व हॅम्लेटमध्ये फारसा फरक नाही. निदान विचार करण्यापुरता तरी आपल्यात व हॅम्लेटमध्ये साम्य आहे असं वाटायला लागलंय. पण त्याचं ते सुप्रसिद्ध स्वगत कितपत लागू होतंय याची मात्र शंका आहे. गेल्या दशकाचा विचार करू जाता सुरूवात २०१० पासून करावी लागेल. ...