Posts

Showing posts with the label Court

तारीख पे तारीख : न्यायालय व सिनेमा

Image
दामिनी सिनेमात शेवटाकडे वकील गोविंद न्यायायालयात ‘ तारीख पे तारीख ’ असे पोटतिडकीने बोलतो तेव्हा न्याय मिळायला होणारा विलंब या गोष्टीकडे तो लक्ष वेधून घेत असतो. त्याच्या बोलण्यात काही एक प्रमाणात तथ्य ही आहे. नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशांनी देखील एका खटल्याच्या सुनावणी संदर्भात हा सुप्रसिद्ध संवाद प्रत्यक्ष न्यायालयात उच्चारला. भारतासारख्या खंडप्राय व विविध जाती , धर्मांनी बनलेल्या , भरपूर लोकसंख्या असणार्‍या देशात न्यायव्यवस्थेवर पडणारा ताण सुद्धा याला कारणीभूत आहे. दुर्दैवाने हा मुद्दा कुठल्या सिनेमात मांडलाय गेलाय का हे आठवत नाही. दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झानी न्यायप्रक्रियेला होणारा विलंब व त्यामुळे पीडितांना न मिळणारा किंवा उशिरा मिळणारा न्याय , त्यांच्या आशेवर पडणारे पाणी सोबत येणारी आर्थिक ओढगस्ती याला केंद्रस्थानी ठेवून ‘ मोहन जोशी हाजिर हो ’ (१९८४) या सिनेमात हा विषय हाताळला होता. तरीही वकील गोविंद म्हणतो त्याप्रमाणे न्यायालयात बर्‍याच खटल्यांसंदर्भात पीडितांच्या हाती येते ती फक्त ‘ तारीख ’. कोर्टरूम ड्रामा हा सिनेमातला एक प्रकार. न्यायालयात घ...

ख्वाडा : वस्तुस्थितीनिदर्शक

Image
ढोबळ अर्थाने सिनेमाचे दोन भाग पडतात. व्यावसायिक सिनेमा आणि वास्तववादी सिनेमा. व्यावसायिक सिनेमाचे काही ठोकताळे असतात. त्यात कथा-कथानक यांचा निश्चित आलेख असतो. त्या आलेखात बऱ्याच गोष्टींचा भरणा असतो जसे नायक-नायिकेचे प्रेम, त्यांचे रुसवेफुगवे, गाणी, धिंगामस्ती, विनोदाची रेलचेल, खलनायक, त्याचे कारनामे आणि शेवटी हाणामारीनंतर हॅपी एंडिंग. वास्तववादी सिनेमात कथेपेक्षा आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून एका सुरुवात ते शेवट असं असणाऱ्या कथानकाची निवड केलेली असते.  त्यात प्रेक्षकांवर प्रभाव पाडावा म्हणून मुद्दाम सिनेमॅटिक तंत्रांचा वापर केला जात नाही. आपल्याला काय सांगायचं आहे ते तो जास्तीत जास्त प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच तो वास्तववादी होतो. त्यातील पात्रे जिवंत व्यक्ती होतात. सिनेमाच्या तंत्राचा वापर कमी प्रमाणात करून जगणाऱ्या व्यक्तींचे आयुष्य कसे आहे, त्याला किती अडथळे सहन करायला लागतात, ते त्यावर मात करतात का अशा प्रश्नांचा विचार केलेला असतो. मनोरंजन हे या सिनेमाचे सूत्र नसते तर आयुष्याचा/जीवनाचा घेतलेला मागोवा हा उद्देश असतो. ख्वाडा हा अशाच सूत्राचा सिनेमॅटिक...

कोर्ट : प्रेक्षकांसमोर प्रश्न उभे करणारे ‘कोर्ट’

Image
आपण जेव्हा सिनेमा बघतो तेव्हा त्या कडून काय अपेक्षा करतो? त्याने मोजलेल्या पैश्याला शंभर टक्के मनोरंजन द्यायला हवं. वास्तव आयुष्यातल्या कटकटी परत पडद्यावर दाखवून मोजलेल्या पैश्यांची किंमत कमी करू नये. मनोरंजन करण्यासाठी गाणी, संगीत, दीर्घकाळ लक्षात राहतील असे संवाद, नायक-नायिकांचा चकचकीत आयुष्य आणि इतर बऱ्याच गोष्टी दाखवाव्यात. जेणेकरून चित्रपटगृहाबाहेर आल्यावर त्यातील अशक्य गोष्टी वास्तव वाटाव्यात आणि तेवढ्या क्षणापुरतं ते जगणं जगायला लावावं. पैसे फिटल्याचा पुरेपूर आनंद त्याने द्यावा. या पार्श्वभूमीवर नुकताच प्रदर्शित झालेला कोर्ट वरील अपेक्षांना उतरतो का ते बघणं संयुक्तिक ठरतं. महाराष्ट्र शासन विरुद्ध नारायण कांबळे (वीरा साथीदार) या केसमध्ये पासष्ट वर्षाचे लोकशाहीर असणारे हे गृहस्थ पोवाडे गाऊन दलित चळवळीला हातभार लावत असतात. अशाच एका कार्यक्रमात त्यांना अटक केली जाते. पोलीसांचं म्हणणं असतं त्यांच्या एका गाण्यामुळे पवार नावाच्या गटार साफ करणाऱ्या सफाई कामगाराने आत्महत्या केलेली असते. त्यांचं गाणं हे आत्महत्या करायला उद्युक्त करणारं असतं. या कामी वकील व्होरा (विव...