Posts

Showing posts from July, 2015

द घोस्ट रायटर : राजकीय थ्रिलर

Image
मला नेहमीच मोठ्या दिग्दर्शकांच्या मोठ्या सिनेमांपेक्षा छोटे सिनेमे जास्त आवडतात. उदा. कुरोसावाचा हाय अँड लो , हिचकॉकचा रोप , स्पीलबर्गचा वॉर ऑफ द वर्ल्डस . हे सिनेमे त्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रभाव टाकणाऱ्या सिनेमांसारखे नाहीत तरी त्यांचं महत्व कमी होत नाही कारण त्यांनी त्या विषयाकडे एका खास दृष्टीकोणातून पाहिलेलं असतं. रोमन पोलंस्कीचे सिनेमेसुद्धा जागतिक स्तरावर प्रभाव टाकणारे आहेत हे आपल्याला माहितच आहे. हा सिनेमा जरी त्याच्या आधीच्या सिनेमांसारखा नसला तरी आपला छोटेखानी प्रभाव सोडणारा आहे. अॅडम लँग (पियर्स ब्रॉस्नन) हे पूर्वाश्रमीचे ब्रिटिश पंतप्रधान आपल्या आयुष्यावर आधारित मेमॉयर लिहायचं ठरवतात. त्यांचा पहिला घोस्ट रायटर माईक मॅकआरा समुद्र किनारी मेलेला आढळतो. जे सिनेमाच्या सुरुवातीलाच दाखवलं जातं. त्याच्या ऐवजी एका नवीन घोस्ट रायटरला (इवान मॅकग्रेगर) हे काम दिलं जातं. काम करत असताना त्याला आधीच्या लेखकाने लँग आणि लँगच्या राजकीय कारकिर्दीबद्दलचे काही रहस्य शोधलेले असतात ते हाती लागतात. तो त्यांचा माग काढायचा प्रयत्न करतो पण त्यात त्याचा जीव जाण्याचा धोका निर्माण होतो. तर...

ऑल अबाऊट अॅना : कथानक असणारी पोर्न फिल्म

Image
पोर्न फिल्म्स ह्या आपल्या इथे चोरून बघाव्यात असा अलिखित संकेत आहे. त्यात आधीच आपल्याकडे सेक्सविषयी खूप गोंधळ आहे. सेक्सवर बोलावं का नाही , लैंगिक शिक्षण असावं का नको , द्यायचं तर कोणत्या वयात , आपल्यासारख्या (खूप) जुन्या संस्कृतीला ते मानवेल का नाही , मानवलं तर वयात येणाऱ्या मुलांवर त्याचा काय परिणाम होईल , जर झाला तर तो कसा हाताळायचा , निर्भया प्रकरणापासून तर सेक्सविषयी जी ती गोष्ट चव्हाट्यावर आली आहे. तरी त्यातून म्हणावे तसे काही हातात आले नाही. आपल्या इथे पोर्नच्या नावाखाली जे बीभत्स दाखवले जाते त्यालाही तोड नाही. त्यामुळे बघणीय पोर्न फिल्म्स बनतील अशी शक्यता बिलकुल नाही. डॅनिश निर्माता-दिग्दर्शक लार्सं वॉन ट्रायर यांनी याच गोष्टीचा विचार करून ह्या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यांचा या पाठीमागचा उद्देश असा होता की चांगली कथानक असणारा पोर्न सिनेमा बनवायचा. नेहमीच्या पोर्नसमध्ये स्त्री-पुरुषांच्या बॉडी पार्ट्सचे क्लोज अप्स दाखवून त्याला प्रेक्षकांना दूर ठेवण्यात येतं खासकरून स्त्री प्रेक्षकांना. ट्रायरनी याला फाटा देण्यासाठी हा सिनेमा बनवला. अँना (ग्रे बे) ही त...

कॅरी ऑन मराठा : दे दणादण प्रेमिक बाणा

Image
भारत स्वतंत्र झाल्यावर सर्व राज्यांची निर्मिती करताना त्या त्या क्षेत्रात बोलली जाणारी भाषा हा निकष मानला गेला आणि भाषावार प्रांत रचना करून स्वतंत्र भारताचे प्रजासत्ताक देशात रुपांतर झाले. भाषावार प्रांत रचना केली असली तरी लोकांच्या संस्कृतीत थोडाच बदल घडणार आहे. खासकरून स्वजातीतल्या विवाहासाठी अशा भाषावार प्रांतांचा अडथळा कधीच येत नाही. पण दोन विभिन्न संस्कृती, भाषा आणि जात असणाऱ्या कुटुंबात मात्र भाषेची अडचण पिढ्यानपिढ्या चालत राहणार हे सुद्धा तितकंच तथ्य आहे. प्रस्तुत चित्रपटात याच विषयाला केंद्रित ठेवून एक कथा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मार्तंड मराठे (गश्मिर महाजनी) हा मार्तंड डेअरी फार्मचा चालक आणि मालक. कोल्हापूर नजीक माल्हेवाडी गावात त्याचा डेअरी फार्म आहे. त्याचा मोठा भाऊ, आई (उषा नाईक) आणि खंडोबाच्या देवळात सापडलेला मुलगा यांच्या समवेत सुखाचं आयुष्य कंठत असतो. तरी पण नेहमी झोपेत दिसणारी एक गोष्ट त्याचा पिच्छा पुरवत असते. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे दुध देण्याच्या निमित्ताने दुध संकलन केंद्रावर त्याची ट्रक घेऊन जात असताना एक मुलगी कुसुम (कश्मीरा कुलकर्णी) त्याला लिफ्ट ...

मर्डर मेस्त्री : उत्तम संकल्पना पण...

Image
नऊ वर्षांपूर्वी आलेल्या लगे रहो मुन्नाभाई आणि या सिनेमात एक साम्य आहे. दिलीप प्रभावळकर. तसेच संकल्पनेच्या पातळीवर सुद्धा ते सारखेच आहेत असं म्हणायला वाव आहे. अर्थात दोन्हींच्या विषयात आणि मांडणीत ते दोन ध्रुवांवर आहेत तरी त्यात साम्य आहे ते त्यांच्या मुळाशी असणाऱ्या चमकदार कल्पनेसाठी. लगे रहो... मध्ये गांधीजी आणि त्यांचे विचार आजच्या काळाशी एका गुंडाच्या सद्सद्विवेकबुद्धीशी गुंफून राजकुमार हिरानीने मजा आणली होती. इथे सुद्धा एक चमकदार कल्पना आहे. एक पोस्टमन चोरून पत्र वाचण्याच्या खोडीमुळे तीन कुटुंबात कसा गोंधळ उडवून देऊ शकतो ही. तो पोस्टमन आहे मळगावचा प्रभाकर (हृषीकेश जोशी). पत्र देणे, घेणे, पेटीतनं पत्र काढून त्यांची छाननी करून ती योग्य जागी पोचवणे ही कामे तो करतो. तरी पण इमानेइतबारे चालणाऱ्या या कामात त्याला रस नाही. त्याला रस आहे ते ज्यांची पत्रे तो पोचवतो त्यांना लोकं पत्रातून काय सांगतात याची. यासाठी गावातल्या जवळ जवळ सर्वांची पत्रे तो वाचत असतो आणि ज्या पत्रात महत्वाचं नाही ते पत्र त्यांचे त्यांना पोचवत असतो. पण ज्यात महत्वाचं आहे ते मात्र त्यांना न देता पत्र आलंच नाही अस...

शटर : (अ) नैतिक थ्रिलर

Image
दुर्जन माणसं नेहमी दुर्जनच असतात पण सज्जन माणसं कधी कधी दुर्जन बनतात तेव्हा त्याला काही कारणं असतात का? ती नैतिकतेच्या वाटेने जाणारी वाट वाकडी करून अनैतिक, सामाजिक संकेतांच्या विरोधात जातात तेव्हा त्यात त्यांना त्यातलं थ्रिल अनुभवायचं असतं का की समाजमान्य नैतिक जगणे एका विशिष्ट काळानंतर कंटाळवाणे होत असते म्हणून ती अनैतिक गोष्टींच्या आहारी जातात? जेव्हा असा नायक आपल्या सुखी एकसुरी सुखवस्तू आयुष्यातून एकदम एखाद्या अनैतिक समजल्या जाणाऱ्या अनुभवला भिडतो तेव्हा त्यातनं बाहेर आल्यावर त्याच्यात बदल होतो का की तो अनुभव परत परत त्याला घ्यावासा वाटतो. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शटर सिनेमात नायक जितेंद्रला असे प्रश्न पडतात तेव्हा त्याच्यात निश्चित असा बदल झालेला असतो. जितेंद्र उर्फ जित्याभाऊ (सचिन खेडेकर) हा शिपवर काम करणारा नोकरदार इसम. तो काही दिवसांसाठी घरी परत आलाय. त्याचं घर बऱ्यापैकी मोठं आहे. निवृत्त झाल्यावर पेन्शनची सोय व्हावी म्हणून कम्पाउंडला लागून दुकानाचे तीन गाळे बांधून ते भाड्याने दिले आहेत. त्यातल्या एका गाळ्यावर त्याने दावा ठोकला आहे. त्याच्या मेहुण्याने तीन वर्...