ऑल अबाऊट अॅना : कथानक असणारी पोर्न फिल्म

पोर्न फिल्म्स ह्या आपल्या इथे चोरून बघाव्यात असा अलिखित संकेत आहे. त्यात आधीच आपल्याकडे सेक्सविषयी खूप गोंधळ आहे. सेक्सवर बोलावं का नाही, लैंगिक शिक्षण असावं का नको, द्यायचं तर कोणत्या वयात, आपल्यासारख्या (खूप) जुन्या संस्कृतीला ते मानवेल का नाही, मानवलं तर वयात येणाऱ्या मुलांवर त्याचा काय परिणाम होईल, जर झाला तर तो कसा हाताळायचा, निर्भया प्रकरणापासून तर सेक्सविषयी जी ती गोष्ट चव्हाट्यावर आली आहे. तरी त्यातून म्हणावे तसे काही हातात आले नाही. आपल्या इथे पोर्नच्या नावाखाली जे बीभत्स दाखवले जाते त्यालाही तोड नाही. त्यामुळे बघणीय पोर्न फिल्म्स बनतील अशी शक्यता बिलकुल नाही.

डॅनिश निर्माता-दिग्दर्शक लार्सं वॉन ट्रायर यांनी याच गोष्टीचा विचार करून ह्या सिनेमाची निर्मिती केली आहे. त्यांचा या पाठीमागचा उद्देश असा होता की चांगली कथानक असणारा पोर्न सिनेमा बनवायचा. नेहमीच्या पोर्नसमध्ये स्त्री-पुरुषांच्या बॉडी पार्ट्सचे क्लोज अप्स दाखवून त्याला प्रेक्षकांना दूर ठेवण्यात येतं खासकरून स्त्री प्रेक्षकांना. ट्रायरनी याला फाटा देण्यासाठी हा सिनेमा बनवला.

अँना (ग्रे बे) ही तरुणी योहान या तरुणाच्या प्रेमात असते पण तो एका जहाजावर कामाला जातो. तो पाच वर्ष येत नाही. तो पर्यन्त अँना डॅनियल नावाच्या तरुणासोबत राहायला लागून एक फ्लॅट विकत घेऊन संसार करायचं ठरवते. पण योगायोगाने योहान वापस येतो अन अँनाच्या मनात चलबिचलता वाढायला लागते.

सिनेमा प्रदर्शित झाल्यावर डेन्मार्कमध्ये व युरोपात खूप चर्चिला गेला अन यशस्वीपण झाला. खासकरून स्त्री प्रेक्षकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यांना यातील प्रसंग बीभत्स न वाटता समरस होणारे वाटले. सिनेमात ग्रे बेचा चांगला अभिनय आणि जेसिका निल्सनचं आपला प्रेक्षक कोण आहे हे लक्षात ठेऊन केलेलं दिग्दर्शन वाखाणण्यासारखं.

राहता राहिला आपल्या बघण्याचा दृष्टीकोण. तर हा सिनेमा मोबाइल, पीसी, डीव्हीडी(रस्त्यावर मिळणाऱ्या) किंवा इतर मार्गाने बघू शकता पण तो कोणा बरोबर ते ज्यानं त्यानं ठरवावं.

रेटिंग ३/५ 

Comments