Posts

लातूर पॅटर्न कादंबरी का दुर्लक्षिली गेली?

Image
काही दिवसांपूर्वी फेसबुकवर मित्र भारत निलखने मराठीतील दुर्लक्षित लेखक अशा अर्थाची पोस्ट टाकली होती व इमॅन्युलने मला टॅगलं होतं. त्या पोस्टमुळेच मला हे लिहावंसं वाटलं. पार्श्वभूमी २०११ मध्ये कादंबरीचं प्रकाशन झालं. यावर्षी दहा वर्ष होतील कादंबरीला. प्रकाशन झाल्यावर वाटलं होतं लवकरच सर्व थरातून तिची दखल घेतली जाईल. या विषयावर लिहिणारे पहिले आपणच म्हटल्यावर उत्साहाने वाचक त्याचं स्वागत करतील. समीक्षा होईल. पुरस्कार मिळतील. असं किमान वर्षभर तरी वाटत होतं. बऱ्याच पुरस्कारांसाठी पाठवली. राज्य ते विविध ठिकाणच्या स्थानिक पुरस्कारांना पाठवली. अगदी पुण्याच्या नगर वाचन मंदिराच्या पुरस्कारासाठी स्वतः तिथे जाऊन देऊन आलो होतो. तसेच साहित्य अकादमी युवा पुरस्कार देते ३५ वर्षांखालील लेखकांच्या पहिल्या साहित्यकृतीला. मला आता नीटसं आठवत नाही पण अक्षरमानवने किंवा की मी त्यांचा फॉर्म भरून पाठवला होता बहुदा नाही सुद्धा. त्यामुळे तो मिळेल निदान वयाच्या अटीत बसत होतो म्हणून. पण कुठून कसलाच प्रतिसाद आला नाही. कादंबरी प्रकाशित झाल्यावर पेपरात परीक्षणे/समीक्षा छापून येईल म्हणून महिनाभर प्रत्येक पेपरची रविवारची...

कोरोना काळ, फोबिया आणि दहशत

Image
जानेवारीत नेहमीसारखी वर्षाची सुरूवात झाली. आयुष्य नॉर्मल होतं. दिल्लीतील विद्यापीठात विद्यार्थ्यांवर हल्ला झाला म्हणून मोठ्या प्रमाणात निदर्शनं चालू झाली होती. फेब्रुवारीत परत दिल्लीतच दंगली उसळल्या. केंद्र सरकारच्या या फेजमध्ये अजून काय काय बघायला मिळणार अशी चर्चा ऐकू यायला लागली. याच काळात चीनमध्ये कोरोना नावाचा एक व्हायरस पसरला आहे. तो संसर्गजन्य आहे. त्याने तात्काळ माणूस मरतो असं ऐकण्यात यायला लागलं. इटलीमध्ये केसेस वाढायला लागल्यावर इतर देशात सुद्धा तो पसरतोय हे बातम्यातून कळायला लागलं. विमानाने प्रवास करणाऱ्यांमुळे तो मोठ्या प्रमाणात पृथ्वीभर पसरतोय असं सुरूवातीच्या पाहणीतून लक्षात आलं. पँडेमिकची सुरूवात झाली होती. ३० जानेवारीलाच वूहान प्रांतातून परतलेल्या केरळमधील एका विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. तो भारतातला पहिला कोरोनाबाधित. २४ मार्चला रात्री बारापासून देशात लॉकडाऊन करण्यात आलं. ते का केलं, कशासाठी केलं हे कळण्या अगोदरच सगळं बंद करण्यात आलं. जीवनावश्यक वस्तू घेण्याची मुभा असली तरी संपूर्ण शहर बंद केलं गेलं होतं. लातूर बंद किंवा भारत बंद बघण्याची सवय अस...

न भावलेला ‘सुपर ३०’

Image
ऋतिक रोशन अभिनीत ‘सुपर ३०’ मधील सर्वात चांगला प्रसंग म्हणजे आनंदकुमारला लल्लनमुळे आपण किती मोठी घोडचूक केली याची जाणीव होते तो. सिनेमातील इतर गोष्टी मात्र नेहमीची कथा वाटली. मी व्यक्तिशः शिक्षणव्यवस्थेवरील भारतीय सिनेमांपासून दूरच राहतो. त्याला एक कारण आहे. मी एकूण बारा वर्षे महाविद्यालयात घालवली आहेत. बारावी सायन्सची दोन, बीकॉमची दोन, बीएस्सीची तीन वर्ष (बीकॉम-बीएस्सी मिळून पाच वर्ष. सर्व विषयात नापास.) आणि त्यानंतर बीए-एमए. महत्त्वाच्या सर्व विद्याशाखांचा अनुभव घेतल्यामुळे एकूणच शिक्षणाबद्दल आजही मनात कटुताच आहे. त्यामुळे सिनेमात जेव्हा शिक्षणावर भाष्य केल्याच्या थाटात कथा मांडली जाते तेव्हा मला त्याचवेळी अंदाज आलेला असतो की कथानक खूपच ढोबळ स्वरूपात मांडलेलं असणार. वास्तव दाखवण्याचं धारिष्ट्य अजून तरी निर्माता-दिग्दर्शकांनी दाखवलेलं नाही. चर्चेपुरती चटकन आठवणारी नावे म्हणजे ‘दहावी फ’, ‘तारे जमीं पर’ आणि ‘थ्री इडियट्स’. तिन्हीत शिक्षणव्यवस्थेचं बऱ्यापैकी चित्रण केलं आहे. तरीही मला हे सिनेमे तितकेसे प्रभावी वाटत नाहीत जितके ते असावयास हवेत. त्याचं कारण आपल्या सामाजिक रचनेत व नेणीवेत आह...

तारूण्यातला हॉलिवुडचा न पुसला जाणारा ‘डीऽऽऽप इम्पॅक्ट’

Image
केंद्रसरकारच्या ‘ मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन ’ च्या २०१७ च्या अहवालानुसार १५ ते ३४ हे भारतीय युवक/युवतींचं तरूणपणाचं ठरवलेलं वय आहे. याचा विचार केला तर माझं तरूण असण्याचं वय कधीच सरलंय. मी तरूण राहिलो नाही असं केंद्र सरकारला वाटतंय म्हटल्यावर ते बरोबरच असणार. तारूण्य हे आकड्यांवर नसतं, असं आपण नेहमी म्हणतो. ‘ मन करा रे प्रसन्न , सर्व सिद्धीचे कारण ’   असा सुविचार शाळेच्या भिंतीवर वाचलेला आठवतो तेव्हा वाटतं हेही खरंय. तसं पाहिलं तर दोन्हीतही तथ्य आहे. सुविचार मनात बिंबवला तर वयाचा अडसर कधीच येणार नाही. सरकारी आकडे खरे मानले तर आपण नेमकं त्याकाळात काय करत होतो याचं सिंहावलोकन करायची ही वेळ आहे असं वाटतं. मी हे आकडेच गृहीतक मानून बोलणार आहे. १५ ते ३४ म्हणजे १९९६ ते २०१५ हे माझं तरूण असण्याचं वय. या वयाचा विचार केला तर सर्वसाधारण तरूण हे दहावी , बारावी , पदवीधर व पदव्युत्तर पदवीधर होणे या टप्प्यातून जातात. मग नोकरी/व्यवसायाच्या मागे लागतात. त्यात जम बसतोय असं वाटायला लागलं की लग्न करतात. संसार चालू होतो. काही फॅमिली प्लॅनिंग वगैरे केलं नसेल तर लग्नाच्य...

शॉन कॉनरी : जेम्स बॉंडच्या पलीकडे जाणारा अभिनेता

Image
इयान फ्लेमिंगच्या बॉंड या पात्राला साकारायला शॉन कॉनरीनी सुरूवात केली तेव्हा अमेरिका आणि रशियातील टेन्शन जीवघेणी झाली होती. शीतयुद्ध, व्हिएतनाम युद्धामुळे जग काळवंडलं होतं. त्यामुळे असेल कदाचित किंवा एकूणच कॉनरीच्या अभिनयाची जादू असेल जेम्स बॉंड हे पात्र सिने इतिहासातील सर्वाधिक परिचीत पात्र झालं. पण डॉ. नो (१९६२) मुळे जगात सुप्रसिद्ध झालेले कॉनरी त्याच्या यशाने वैतागून गेले होते. इतके वैतागले होते की त्यांचे मित्र व अभिनेता मायकल केन म्हणतात कॉनरींना बॉंडविषयी बोलणं आवडायचं नाही. रस्त्यातून जाताना देखील लोकं ‘तो बघ जेम्स बॉंड’ म्हणायचे. त्यांना त्या पात्रामुळे मिळालेल्या प्रसिद्धीचा इतका राग यायचा की ते म्हणायचे ‘जेम्स बॉंड हे पात्रच मला आवडेनासं झालंय. याचा कधीतरी खून करीन मी.’ निव्वळ बॉंड साकारणे हेच त्यांच्या आयुष्याचं उद्दिष्ट नव्हतं. एक अभिनेता म्हणून आपल्या कौशल्याला पैलू पाडणे हा मुख्य उद्देश होता. स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग शहरातील फाऊंटेनब्रिज येथे जन्मलेले शॉन यांनी एडिनबर्गमधील एका कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये मिल्कमॅन म्हणून काम केलं. सोळाव्या वर्षी ते रॉयल नेव्हीमध्ये रूजू ...