Posts

Showing posts from October, 2015

शानदार : घड्याळ पहायला लावणारा

Image
विकास बहल आणि कंगना राणावतचा मागच्या वर्षी क्वीन आला तेव्हा दिग्दर्शक म्हणून विकास बहलची ओळख चिल्लर पार्टी नावाच्या लहान मुलांच्या सिनेमाच्या दोन दिग्दर्शकांपैकी एक अशी झालेली. त्या आधी निर्माता म्हणून त्याने असंख्य सिनेमांची निर्मिती केलेली. चिल्लर पार्टीचं चिक्कार कौतुक झालं सोबत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात वर्णी पण लागली. क्वीनच्या आधी फॅशनमधील भूमिकेसाठी तिचं कौतुक तसेच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पण यशस्वी अभिनेत्री म्हणून काही ती प्रभावी नव्हती. सिनेमा चालण्या इतपत ती प्रेक्षक खेचू शकत नाही तसेच तिच्या भूमिकेत वैविध्य नाही असा आरोप होत होता. क्वीनने मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवला. अभिनेत्रीच्या जीवावर सिनेमे हिट करता येतात हा संदेश गेला तसेच एक दिग्दर्शक म्हणून विकास बहलची स्वतंत्र ओळख तयार झाली. अनपेक्षित यश मिळाल्यामुळे त्याच्या पुढील सिनेमाची उत्सुकता वाढलेली. शानदारची सुरुवात कथाबाह्य निवेदनाने होते. कुणी विपीन (पंकज कपूर) एका छोट्या मुलीला आलियाला (आलिया भट) त्याच्या अलिशान घरी घेऊन येतो. ती अनाथ असते असं तो म्हणतो. त्याची आई (सुषमा सेठ) व वर्तमानकालीन पत्...

ख्वाडा : वस्तुस्थितीनिदर्शक

Image
ढोबळ अर्थाने सिनेमाचे दोन भाग पडतात. व्यावसायिक सिनेमा आणि वास्तववादी सिनेमा. व्यावसायिक सिनेमाचे काही ठोकताळे असतात. त्यात कथा-कथानक यांचा निश्चित आलेख असतो. त्या आलेखात बऱ्याच गोष्टींचा भरणा असतो जसे नायक-नायिकेचे प्रेम, त्यांचे रुसवेफुगवे, गाणी, धिंगामस्ती, विनोदाची रेलचेल, खलनायक, त्याचे कारनामे आणि शेवटी हाणामारीनंतर हॅपी एंडिंग. वास्तववादी सिनेमात कथेपेक्षा आजूबाजूच्या परिस्थितीचा विचार करून एका सुरुवात ते शेवट असं असणाऱ्या कथानकाची निवड केलेली असते.  त्यात प्रेक्षकांवर प्रभाव पाडावा म्हणून मुद्दाम सिनेमॅटिक तंत्रांचा वापर केला जात नाही. आपल्याला काय सांगायचं आहे ते तो जास्तीत जास्त प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच तो वास्तववादी होतो. त्यातील पात्रे जिवंत व्यक्ती होतात. सिनेमाच्या तंत्राचा वापर कमी प्रमाणात करून जगणाऱ्या व्यक्तींचे आयुष्य कसे आहे, त्याला किती अडथळे सहन करायला लागतात, ते त्यावर मात करतात का अशा प्रश्नांचा विचार केलेला असतो. मनोरंजन हे या सिनेमाचे सूत्र नसते तर आयुष्याचा/जीवनाचा घेतलेला मागोवा हा उद्देश असतो. ख्वाडा हा अशाच सूत्राचा सिनेमॅटिक...

राजवाडे अॅण्ड सन्स : वर्तमानकालीन पुण्याचा तुकडा

Image
मराठी सिनेमात शहराला केंद्रस्थानी ठेवून कथानक दाखवणारे सिनेमे तसे कमीच आहेत किंवा नाहीतच म्हणायला हरकत नाही. मुंबई महानगराची कहाणी सांगणारे हिंदी सिनेमे बनवले असले तरी तिच्या अंतरंगात शिरून त्यातील वृत्ती-प्रवृत्तीवर प्रहार करणारे किंवा तिची रोमँटिक बाजू दाखवणारे असंख्य येत असतात किंवा आहेत. पण इतर शहरांना त्यांचं व्यक्तिमत्व असतं. त्यांचा इतिहास असतो. तिथे वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्याचा आयाम वेगळा असतो. काही गोष्टी सर्वत्र सारख्याच असतात उदा. कोलगेट पेस्ट. तरीही त्या ठिकाणचं स्थान माहात्म्य असतं ते त्या त्या ठिकाणालाच लागू होतं. उदा. पुणे शहर. पुणे शहराबद्दल खूप काही सांगावं लागू नये इतकं ते मराठी/भारतीय भावविश्वाशी जोडलं गेलं आहे. कधी जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट होण्याच्या तर कधी भांडारकर संस्थेवरच्या हल्ल्याने किंवा कधी ते अतिरेक्यांचं स्लीपर सेल असण्याच्या कारणाने किंवा सांस्कृतिक राजधानी असं बिरुदावली मिरवण्याच्या किंवा ऐतिहासिक काळापासून महत्वाच्या असंख्य घटनांचा साक्षीदार असण्याच्या निमित्ताने. सचिन कुंडलकर दिग्दर्शित राजवाडे अॅण्ड सन्स हा सिनेमा वर्तमानकालीन पुण्याच्य...

जॅकी चॅन आणि मी

Image
जॅकी चॅन माझ्या आयुष्यात कधी आला ते नेमकं आठवत नाही पण माझ्या वडिलांना व एका आतेभावाला तो प्रचंड आवडायचा . लातुरात तेव्हा उषाकिरण , रत्नदीपसारखे थिएटर्स फक्त याचेच सिनेमे दाखवायचे किंवा हाँगकाँगचे कुंग - फू कराटेचे सिनेमे दाखवायचे . जॅकी चॅन सोबत सॅमो हंग , युआन बियू , मिशेल यो या व ईतर अॅक्शन जॉनराला वाहिलेल्या नटनटींचे सिनेमे यायचे पण सटीसामाटी . जॅकी चॅन मात्र त्या दोघांना खूप आवडायचा . ते दोघं चित्रपट आला की आवर्जून बघायला जायचे . मला आठवतय मी  त्याचा  पहिला चित्रपट बघितला तो प्रोजेक्ट ए भाग दोन . हा चित्रपट प्रोजेक्ट ए चा सिक्वल होता परंतु फक्त कथानायक जॅकी चॅन सोडला तर ईतर महत्त्वाचे कलाकार युआन बियू व सॅमो हंग नव्हते . तरीपण तो लक्षात राहिला त्यातल्या अॅक्शन प्रसंगांसाठी .  त्यात शेवटाकडे एक प्रसंग आहे . जॅकीला पकडून एका मोठ्या कांडप यंत्रात ठेवले जाते अन्   कांडप यंत्र चालू केलं जातं . कांडप यंत्रात जशी खाली मिरची ठेवली जाते अन् ...